नाशकात हिंदू तरुणीच्या मुस्लिम तरुणाशी लग्नाची पत्रिका व्हायरल, दबावानंतर विवाह सोहळा रद्द

Nashik Inter Religion Marriage Cancelled After Invitaion Card Viral on Whatsapp

Nashik Inter Religion Marriage : नाशिकमध्ये दोन भिन्न धर्मातील तरुण आणि तरुणीला लग्न करायचे होते. या लग्नाला त्यांच्या कुटुंबीयांनीही मान्यता दिली होती, पण समाजाच्या दबावापुढे झुकून हा नियोजित विवाह सोहळा रद्द करण्यात आला आहे. लग्नाची पत्रिका व्हायरल झाल्याने अनेकांनी याला लव्ह-जिहाद ठरवले. लग्नाला एवढा विरोध झाला की, वर आणि वधूच्या कुटुंबीयांना समाजासमोर झुकावे लागले. Nashik Inter Religion Marriage Cancelled After Invitaion Card Viral on Whatsapp


विशेष प्रतिनिधी

नाशिक : नाशिकमध्ये दोन भिन्न धर्मातील तरुण आणि तरुणीला लग्न करायचे होते. या लग्नाला त्यांच्या कुटुंबीयांनीही मान्यता दिली होती, पण समाजाच्या दबावापुढे झुकून हा नियोजित विवाह सोहळा रद्द करण्यात आला आहे. लग्नाची पत्रिका व्हायरल झाल्याने अनेकांनी याला लव्ह-जिहाद ठरवले. लग्नाला एवढा विरोध झाला की, वर आणि वधूच्या कुटुंबीयांना समाजासमोर झुकावे लागले.

दोन्ही कुटुंबांचा लग्नाला होकार

मुलीचे वडील प्रसाद आडगावकर हे दागिन्यांचा व्यवसाय करतात. त्यांनी सांगितले की, दोन्ही कुटुंबांच्या सहमतीने आणि उपस्थितीत मुलाने आणि मुलीने नाशिक कोर्टात नोंदणी पद्धतीने विवाह केला आहे. हेच लग्न 18 जुलै रोजी संपूर्ण रीतीरिवाजानुसार करण्याचा ते प्रयत्न करत होते. यासाठी नाशिकमधील एक मोठे हॉटेलही बुक करण्यात आले होते. या प्रकरणात कोणतीही बळजबरी नव्हती. वडिलांनी सांगितले की, एवढे सर्व होऊन ते आपल्या मुलीच्या बाजूने उभे आहेत. त्यांना तिच्या निवडीवर पूर्ण विश्वास आहे.

दोन्ही कुटुंबांची अनेक वर्षांपासून ओळख

आडगावकर पुढे म्हणाले, मुलगी दिव्यांग असल्याने तिच्यासाठी एक चांगला मुलगा शोधणे कुटुंबाला कठीण जात होते. अलीकडेच तिच्याबरोबर शिकणाऱ्या मित्राशी त्यांच्या संमतीने तिचे लग्न लावण्याचा निर्णय घेतला. दोघांचे कुटुंबीय बर्‍याच वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते, त्यामुळे दोन्ही कुटुंबांनी लग्नाला होकार दिला.

व्हॉट्सअ‍ॅपवर पत्रिका व्हायरल

प्रसाद आडगावकर म्हणाले, कोरोनाचा धोका लक्षात घेता त्यांना लग्नासाठी फक्त कुटुंब आणि काही जवळच्या लोकांना आमंत्रित करायचे होते. पण त्याआधी अनेक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये लग्नाची पत्रिका फिरली. यानंतर तो कार्यक्रम रद्द करण्याची धमकी देत ​​फोन कॉल आणि मेसेजेस येऊ लागले. 9 जुलै रोजी त्यांना काही लोकांना भेटण्यासाठी बोलावले होते. तेथे त्यांना लग्न रद्द करण्यास सांगण्यात आले.

कुटुंबीयांनी गुन्हा दाखल केला नाही

इतका वाद होऊनही प्रसाद किंवा त्यांच्या कुटुंबाच्या वतीने कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. लाड सुवर्णकर संस्था, नाशिकचे अध्यक्ष सुनील महालकर म्हणाले की, काही दिवसांपूर्वी आम्हाला प्रसाद यांचे पत्र आले. त्यांच्या मुलीचे लग्न रद्द केले आहे, असे लिहिले होते. दुसरीकडे, या प्रकरणाबद्दल मुलाचे कुटुंबीय काहीही बोलले नाहीत.

Nashik Inter Religion Marriage Cancelled After Invitaion Card Viral on Whatsapp

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात