भारतात कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्डच्या जोडीला येणार आणखी पाच लशी, लसीकरणाला मिळणार सुपर बुस्टर

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – कोरोनाचा मुकाबला करण्यासठी सध्या लसीकरण हा सर्वात विश्वासू प्रभावी मार्ग असल्याचे जगभरातील तज्ञांचे मत आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेगही वाढविण्यावर केंद्र सरकारने भर दिला आहे. या प्रयत्नांमध्ये आणखी भर पडणार असून ऑक्टोबर महिन्यापर्यंत लसीकरणासाठी आणखी पाच लशी उपलब्ध होणार आहेत. भारतात सध्या कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या दोन लशींच्या साह्याने लसीकरण मोहिम सुरु आहे. ऑक्टोबरपर्यंत आणखी पाच लशींची अपेक्षा आहे. Indian gets another 5 vaccines till oct.

स्पुटनिक-५ (डॉ. रेड्डीज्‌ लॅबबरोबरील भागीदारीतून), जॉन्सन अँड जॉन्सन (बायोलॉजिकल ई बरोबरील भागीदारीतून), नोव्हाव्हॅक्स (सीरमबरोबरील भागीदारीतून), झायडस कॅडिला आणि भारत बायोटेकची इन्ट्रानेझल या त्या पाच लशी आहेत. रशियन बनावटीच्या स्पुटनिक-५ या लशीला येत्या दहा दिवसांमध्येच परवानगी मिळू शकते, असा अंदाजही सूत्रांनी व्यक्त केला.या लशीची परिणामकारकता ९२ टक्के आहे. रशियाच्या लस नियंत्रक मंडळाने स्फुटनिक-५ लशीच्या उत्पादनासाठी भारतातील डॉ. रेड्डीज्‌ लॅब, हेटेरो बायोफार्मा, ग्लँड फार्मा, स्टेलिस बायोफार्मा आणि विकरो बायोटेक या औषध कंपन्यांबरोबर करार केला आहे.

ही लस जूनमध्ये जनतेला उपलब्ध होण्याची शक्यता असून, सर्व काही नियोजनानुसार झाल्यास, जॉन्सन अँड जॉन्सन आणि झायडस कॅडिला या लशी ऑगस्टमध्ये, नोव्हाव्हॅक्स सप्टेंबरमध्ये आणि नेझल व्हॅक्सिन ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध होण्याचा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला.

Indian gets another 5 vaccines till oct.

वाचा…