लशीकरणाचा विक्रम: ८५ दिवसांत १० कोटींपेक्षा जास्त लोकांना लस; अमेरिका, ब्रिटन आणि चीनलाही टाकले मागे

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारताने कोरोनाविरोधी लसीकरणात शनिवारी विक्रम केला. संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत संपूर्ण देशात 10.12 कोटी डोस देण्यात आले आहेत. दुसऱ्या देशांच्या तुलनेत भारताला एवढ्या लसी देण्यासाठी केवळ 85 दिवस लागले.new record in the name of the country, the corona vaccine to more than 100 million people in 85 days; The US and China were also left behind

एवढ्या वेळेत अमेरिकेत 9.2 कोटी आणि चीनमध्ये 6.14 कोटी डोस देण्यात आले होते. आरोग्य मंत्रालयाने याविषयी माहिती दिली. मात्र एकूण लसीकरणाच्या हिशेबाने पाहिले तर अमेरिका आणि चीन भारतापेक्षा खूप पुढे आहेत.शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत संपूर्ण देशात एकूण 10.12 कोटी डोस देण्यात आले आहेत. आरोग्य मंत्रालयाने एका निवदेनात म्हटले की, केंद्र आणि राज्यांच्य प्रयत्नांमुळे भारतातील मृत्युदर जगातील सर्वात कमी (1.28%) आहे.

सर्वात जास्त डोस ज्येष्ठाना

आतापर्यंत भारतात 90 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला आणि 55 लाख जणांना दुसरा डोस दिला आहे. फ्रंटलाइन वर्कर्समध्ये ही संख्या 99 लाख आणि 47 लाख आहे. 45 ते 60 वर्षांच्या वयाच्या 3 कोटी लोकांना पहिला आणि 6 लाखांपेक्षा जास्त लोकांना दुसरा डोस दिला आहे.

60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 3.95 कोटी लोकांना पहिला आणि 17.88 लाख जणांचा दुसरा डोस दिला.भारताने पहिल्या टप्प्यामध्ये सर्व आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सचे लसीकरण 16 जानेवारीपासून सुरू केले होते. दुसरा टप्पा 1 मार्चपासून सुरू झाला होता.

यामध्ये 45 पेक्षा जास्त वयाच्या आजारी लोकांना आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्यांना लस दिली. यानंतर 2 एप्रिलपासून सुरू झालेल्या टप्प्यामध्ये 45 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्वच लोकांना लसी देण्यात आल्या.

देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. शनिवारी देशात 1.45 लाख नवीन रुग्ण आढळले आहेत. साथ सुरू झाल्यानंतरचा हा सर्वात मोठा आकडा आहे.

new record in the name of the country, the corona vaccine to more than 100 million people in 85 days; The US and China were also left behind