कोरोनाची लस विकत घेण्यासाठी पाकिस्तानकडे नाहीत पैसे, दान मिळण्याची इम्रान खान यांना प्रतीक्षा

Pakistan has no money to buy corona vaccine, Imran Khan waiting for donation

जगभरात कोरोना महामारीविरुद्ध लसीकरण मोहिमेचे भारत नेतृत्व करत आहे. परंतु शेजारी पाकिस्तानकडे मात्र लस विकत घेण्याइतकेही पैसे नाहीत. कंगाल पाकिस्तानला आता कुणीतरी ही लस दान देण्याची अपेक्षा आहे. एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, पाक सरकार आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेतसाठी कोरोना लस खरेदी करू शकत नाहीये. राष्ट्रीय आरोग्य सेवा सचिव आमिर अशरफ ख्वाजा यांनी गुरुवारी लोकलेखा समितीच्या माहितीसंदर्भात माहिती दिली की, सध्या इम्रान सरकार कोरोना महामारीविरुद्ध लढण्यासाठी इतर देशांकडून मिळणाऱ्या मोफत लस पुरवठ्यावर अवलंबून आहे. Pakistan has no money to buy corona vaccine, Imran Khan waiting for donation


विशेष प्रतिनिधी

इस्लामाबाद : जगभरात कोरोना महामारीविरुद्ध लसीकरण मोहिमेचे भारत नेतृत्व करत आहे. परंतु शेजारी पाकिस्तानकडे मात्र लस विकत घेण्याइतकेही पैसे नाहीत. कंगाल पाकिस्तानला आता कुणीतरी ही लस दान देण्याची अपेक्षा आहे. एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, पाक सरकार आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेतसाठी कोरोना लस खरेदी करू शकत नाहीये. राष्ट्रीय आरोग्य सेवा सचिव आमिर अशरफ ख्वाजा यांनी गुरुवारी लोकलेखा समितीच्या माहितीसंदर्भात माहिती दिली की, सध्या इम्रान सरकार कोरोना महामारीविरुद्ध लढण्यासाठी इतर देशांकडून मिळणाऱ्या मोफत लस पुरवठ्यावर अवलंबून आहे.

जगभरात अनेक देश आपल्या नागरिकांना या महामारीपासून वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसींची खरेदी करत आहेत. याउलट पाकिस्तान लस खरेदी करण्याऐवजी आंतरराष्ट्रीय देणगीदार आणि चीनसारख्या देशांवर अवलंबून आहे. इतर देशांनी त्यांची कोरोना लस विनामूल्य उपलब्ध करून द्यावी, याची पाकला आशा आहे.विशेष म्हणजे आणखी एक चिनी कंपनी पाकिस्तानमध्ये त्यांच्या लसीच्या तिसऱ्या टप्प्याची चाचणी घेत आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान कोरोना विषाणूच्या लसीसाठी आंतरराष्ट्रीय समुदायावर, विशेषत: चीनवर अवलंबून असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर मेजर जनरल आमिर इकराम म्हणतात की, चीनने बनवलेल्या कोरोना लसीच्या एका डोसची किंमत 13 डॉलर आहे.

त्याचबरोबर एनएचएसच्या सचिवांनी अशी माहिती दिली आहे की, चीनची फार्मास्युटिकल कंपनी सिनोफर्मने पाकिस्तानला 10 दशलक्ष डोस देण्याचे आश्वासन दिले आहे. यातील पाच लाख डोस पाकिस्तानला देण्यात आले आहेत. आतापर्यंत मिळालेल्या डोसपैकी पाकिस्तानने आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना कोरोनाचे दोन लाख 75 हजार डोस दिले आहेत. या वर्षाच्या अखेरीस सात कोटी नागरिकांना लस देण्याचे पाकिस्तानचे उद्दिष्ट असल्याचेही ते म्हणाले.

Pakistan has no money to buy corona vaccine, Imran Khan waiting for donation

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती