दहशतवाद्यांनी अवघ्या १४ वर्षांच्या मुलाला शरण जाण्यापासून रोखले, अखेर चकमकीत ठार


विशेष प्रतिनिधी

श्रीनगर – जम्मू आणि काश्मिरमध्ये गेल्या तीन दिवसांत चार स्वतंत्र चकमकीत १२ दहशतवाद्यांना लष्कराने कंठस्नान घातले आहे. शोपियाँमधील चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांत अवघ्या १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. Twelve terrorist killed in Jammu and Kashmir

हा अलप्वयीन मुलगा दहशतवादी संघटनेत नुकताच भरती झाला होता. त्याच्या शरणागतीसाठी सुरक्षा दलांनी प्रयत्न केले होते. मात्र, इतर दहशतवाद्यांनी त्याला रोखले. त्याचप्रमाणे, त्याच्या पालकांनीही यापूर्वी शरणागतीसाठी आवाहन केले होते. अखेरीस, तो चकमकीत ठार झाला.शोपियाँ आणि अनंतनाग जिल्ह्यात दोन चकमकीत पाच दहशतवादी ठार झाले. शुक्रवारी (ता.९) शोपियाँ आणि पुलवामा जिल्ह्यांतील चकमकीत पाच दहशतवाद्यांचा मृत्यू झाला होता. या दहशतवाद्यांत जवानाची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचाही समावेश आहे.

दक्षिण काश्मिरमधील अनंतनाग आणि शोपियाँ जिल्ह्यामध्ये शनिवारी चकमकीला सुरूवात झाली होती. अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहारा परिसरातील सेमथनमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. त्याचप्रमाणे, शोपियाँ जिल्ह्यातील हल्दीपूरमध्ये दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी यमसदनास पाठविले. शनिवारी (ता. १०) रात्री एक दहशतवादी ठार झाला.

Twelve terrorist killed in Jammu and Kashmir


वाचा…

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*