एलएसीवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर सीमेच्या सुरक्षेसाठी आजपासून चार दिवसीय कमांडर्स परिषद


LAC वर चीनसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आजपासून भारतीय लष्कराची चार दिवसीय कमांडर्स परिषद सुरू होत आहे. ही परिषद २८ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. परिषदेत सीमेच्या सुरक्षेबाबत सर्वोच्च लष्करी आणि राजकीय नेतृत्व चर्चा करणार आहेत. या परिषदेत लष्करप्रमुखांसह लष्कराच्या सातही कमांडसचे कमांडर आणि प्रधान कर्मचारी अधिकारी सहभागी होणार आहेत. indian army to hold 4 day commanders conference strating from today


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : LAC वर चीनसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आजपासून भारतीय लष्कराची चार दिवसीय कमांडर्स परिषद सुरू होत आहे. ही परिषद २८ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. परिषदेत सीमेच्या सुरक्षेबाबत सर्वोच्च लष्करी आणि राजकीय नेतृत्व चर्चा करणार आहेत. या परिषदेत लष्करप्रमुखांसह लष्कराच्या सातही कमांडसचे कमांडर आणि प्रधान कर्मचारी अधिकारी सहभागी होणार आहेत.

लष्कराचे प्रवक्ते कर्नल राकेश चमोली यांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्मी कमांडर्स कॉन्फरन्सला संबोधित करून, संरक्षण मंत्री, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) यांच्यासह हवाई दल आणि नौदलाचे प्रमुख देखील सशस्त्र दलांमधील लष्कर, हवाई दल आणि नौदल यामधील अधिक समन्वय आणि एकात्मतेवर भर देतील.

लष्करासाठी भविष्याची रूपरेखा

कमांडर्स परिषद दरवर्षी एप्रिल आणि ऑक्टोबर महिन्यात आयोजित केली जाते, हा एक उच्चस्तरीय द्विवार्षिक कार्यक्रम आहे. ही परिषद वैचारिक पातळीवर चर्चा करण्यासाठी एक संस्थात्मक मंच आहे ज्याद्वारे भारतीय लष्कर महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णयांवर विचारविनिमय करते.

परिषदेच्या माध्यमातून संरक्षण मंत्रालय आणि लष्करी व्यवहार विभागाच्या उच्च अधिकार्‍यांशी चर्चा करण्याचा औपचारिक मंचही आहे. या परिषदेदरम्यान, वर्तमान आणि उदयोन्मुख सुरक्षा आणि प्रशासकीय बाबींवर भारतीय लष्कराच्या उच्च नेतृत्वाने विचारमंथन केले जाईल, सीमेवरील परिस्थिती आणि कोविडने निर्माण केलेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्यासाठी भविष्यातील रोडमॅप तयार केला जाईल. साऊथ ब्लॉकमध्ये सकाळी 10 वाजता परिषद होणार आहे.

indian army to hold 4 day commanders conference strating from today

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात