कोरोनाच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याच्या हालचाली गतिमान, लसीकरण वेगाने होण्यासाठी प्रयत्न


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशात कोरोनाविरोधी लसीकरण मोहीम अधिक गतिमान करण्यासाठी दोन डोसमधील अंतर कमी करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.
Corona Vaccination Time Come To Reduce The Gap Of Second Dose Of Corona Vaccine

कोरोनाची दुसरी हळूहळू ओसरत आहे. रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेची शक्यता कमी झाली आहे. परंतु खबरदारी म्हणून आता दोन डोस मधील अंतर कमी करण्यात येत आहे. चीन आणि ब्रिटनमध्ये कोरोनाच्या पुन्हा उद्रेक झाला आहे. त्यामुळे पहिला डोस घेतलेल्याना दुसरा डोस देऊन अधिक सुरक्षित करण्याची योजना आहे. पर्यायाने लसीकरण वेगात होईल, असा अंदाज आहे.

लसीकरण अभियानात ८० टक्के लस ही कोविशील्डची आहे. या लसीच्या दोन डोसमधील अंतर ८४ दिवसांचे आहे. ते आता ३२ ते ४८ दिवसांवर आणावे, असा सल्ला सफदरजंगमधील कोविड तज्ज्ञ आणि कम्युनिटी मेडिसीनचे एचओडी डॉ. जुगल किशोर यांनी दिला आहे.

चीन, ब्रिटनमध्ये कोरोनाचा उद्रेक

चीन आणि ब्रिटनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. नव्या व्हेरिएंटमुळे आणि कोरोना लसीमुळे तयार झालेल्या अँटिबॉडी घटल्यानं हा संसर्ग वाढल्याचे कोविड तज्ज्ञ डॉक्टर अंशुमान कुमार यांनी सांगितलं. भारतात ३० कोटी लोकांनाचलसीचे दोन्ही डोस तर ७० कोटी एकच डोस मिळाला आहे.

Corona Vaccination Time Come To Reduce The Gap Of Second Dose Of Corona Vaccine

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात