नेपाळच्या सीमेवर नाशिकच्या जवानाला वीरमरण , उच्चदाब प्रवाहाचा विजेच्या तारेचा धक्क्याने 3 सैनिकांची प्राणज्योत मालवली


 

या घटनेत एकूण दहा जण जखमी झाले. त्यांना बिरपूरच्या ललित नारायण उपविभागीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चौघा गंभीर जवानांना दरभंगा मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले आहे.Heroic death of a Nashik soldier on the border of Nepal ,3 soldiers killed in Nashik by high voltage current


विशेष प्रतिनिधी

नेपाळ : नाशिकमधील जवानाला नेपाळ सीमेवर वीरमरण आल्याची दुःखद घटना समोर आली आहे.बिहारमधील नेपाळ सीमेलगत बिरपूर येथे शुक्रवारी (14 जानेवारी) सशस्त्र सीमा बलाच्या 45 व्या बटालियनच्या कॅम्पमध्ये प्रशिक्षणार्थी सैनिकांचे प्रशिक्षण सुरु होते.कर्तव्यावर असताना उच्चदाब प्रवाहाचा विजेच्या तारेचा धक्का लागल्याने ३ सैनिकांची प्राणज्योत मालवली.

यापैकी अमोल हिंमतराव पाटील असं महाराष्ट्रातील 30 वर्षीय जवानाचं नाव आहे.या घटनेत एकूण दहा जण जखमी झाले. त्यांना बिरपूरच्या ललित नारायण उपविभागीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चौघा गंभीर जवानांना दरभंगा मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले आहे.

अमोल हिंमतराव पाटील हे नाशिक जिल्ह्यातील नांदगांव तालुक्यातील रहिवासी होते.वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी त्यांच्यावर काळाने घाला घातल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.अमोल यांच्या पश्चात पत्नी, सहा महिन्यांची मुलगी, आई, अविवाहित भाऊ असा परिवार आहे.

उच्चदाब प्रवाहाच्या तारांकडे दुर्लक्ष

प्रशिक्षण मैदानावरील उच्चदाब प्रवाहाच्या तारा आणि खांब काढण्यासाठी सीमा सुरक्षा बलाने संबंधित वीज विभागाला अनेकदा पत्रे लिहिली होती. मात्र वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच योग्य ती दखल न घेतल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं बोललं जात आहे.

Heroic death of a Nashik soldier on the border of Nepal ,3 soldiers killed in Nashik by high voltage current

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात