वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कठोर निर्बंध होण्याची शक्यता , अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक


 

ही बैठक करोनाबाबतच्या सद्यस्थितीची आढावा बैठक कौन्सिल हॉल येथे होणार आहे. या बैठकीला शहर आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.Meeting to be held under the chairmanship of Ajit Pawar


विशेष प्रतिनिधी

पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे.दरम्यान याच पार्श्वभूमीवर निर्बंध आणखी कडक करायचे की नाहीत, याबाबत आज शनिवारी (१५ जानेवारी) होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. ही बैठक करोनाबाबतच्या सद्यस्थितीची आढावा बैठक कौन्सिल हॉल येथे होणार आहे. या बैठकीला शहर आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.


Sharad Pawar : अनिल देशमुखांच्या अटकेवर संतापलेले शरद पवार म्हणाले- तुरुंगात टाकण्याची किंमत भाजपला चुकवावी लागेल!


पुणे जिल्ह्यात कोरोनाचा कहर पाहायला मिळतोय.पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून 5 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आले आहेत. मात्र, गेल्या 24 तासात 10 हजार पेक्षा जादा कोरोना रुग्णांची नोंद झाल्याचं समोर आलं आहे.तर, 2 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.त्यामुळं पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील निर्बंध कठोर होण्याची शक्यता आहे.या बैठकीत अजित पवार काय निर्णय घेणार याकडे पुणेकरांचं लक्ष लागलंय.

Meeting to be held under the chairmanship of Ajit Pawar

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात