HCL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, फ्रेशर्स इंजिनियर विद्यार्थ्यांसाठी भरती


विशेष प्रतिनिधी

इंडिया : फ्रेशर विद्यार्थ्यांसाठी एचसीएलने प्रथमच करिअर प्रोग्रामचे आयोजन केले आहे. चांगले करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या प्रोग्राममध्ये प्रवेश घेणे उपयुक्त होईल. सध्याच्या काळातील आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांचे प्रमाण पाहता ही एक चांगली संधी ठरणार आहे.

HCL recruitment for fresher engineers, Read to know more

BE/B.Tech./MCA/M.Tech. इ. कम्प्युटर सायन्स किंवा आयटी क्षेत्रातील पदवी तुम्ही घेतली असेल तर हा प्रोग्राम तुम्हाला जॉईन करता येईल. आयटी इंजिनियर तसेच कम्प्युटर सायन्स मधील पदवीधर या कोर्स मध्ये ॲडमिशन घेऊ शकतील. २०१८ ते २०२१ सदर परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना ही संधी मिळणार आहे. या प्रोग्रामची पात्रता पुढीलप्रमाणे आहे. उमेदवार ६५ टक्के मार्क्स मिळवून पदवी अथवा पदव्युत्तर परीक्षा पास असणे आवश्यक आहे. नागपूर, लखनऊ, विजयवाडा, मदुराई या शहरांमधील फ्रेश इंजिनियरसाठी संधी असणार आहे. सदर प्रोग्राम एकूण सहा महिन्याचा असणार आहे. तीन महिन्यांच्या ऑनलाइन प्रोग्राम नंतर या उमेदवारांना त्या शहरांमधील ऑफिसमध्ये जाऊन ट्रेनिंग घ्यावे लागणार आहे. तीन महिने व्हर्च्युअल क्लासरूम ट्रेनिंग असणार आहे. ट्रेनिंग घरी राहून करता येणार आहे व नंतरचे तीन महिन्याचे ट्रेनिंग एचसीएल टेक्नॉलॉजीच्या ऑफिसमध्ये जाऊन पूर्ण करावे लागणार आहे. सदर प्रोग्रामचे शुल्क १.५ लाख असून टॅक्स वेगळा भरावा लागणार आहे. या प्रोग्रामनंतर उमेदवारांची निवड ही पूर्णतः त्यांच्या कामावर आणि प्रोग्राम मधील प्रगतीवर अवलंबून असणार आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना आयटी इंजिनिअर, अॅनॅलिस्ट, डिझाईन इंजिनियर या पदांवर नेमले जाणार आहे. या पदांसाठी २.७५लाख ₹ प्रतिवर्ष इतका पगार देण्यात येणार आहे.


Forbes 10 richest billionaires 2021 : मुकेश अंबानी नंतर गौतम अदानींचा जलवा , फोर्ब्सच्या यादीत टॉप 20 मध्ये प्रवेश


यासंबंधी उमेदवारांना आणि विद्यार्थ्यांना एचसीएल टेक्नॉलॉजीच्या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहिती मिळवता येईल. एचसीएल टेक्नॉलॉजी पुढील काळात २०००० कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. एचसीएलमध्ये सध्या १,७६,४९९ कर्मचारी आहेत. यावर्षी २० ते २२ हजार कर्मचारी भरती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे व यामध्ये फ्रेशरची संख्या सहा हजार इतकी असणार आहे असे एचसीएल टेक्नॉलॉजीचे मनुष्यबळ विकास अधिकारी (CHRO) व्हि.व्हि. आप्पाराव यांनी सांगितले. जून २०२१ मध्ये ३२१४कोटी ₹ इतका नफा कंपनीला झाला होता. एचसीएल टेक्नॉलॉजीच्या नागपूर मधील प्रकल्पात १००० कर्मचारी भरती करणार आहेत. फ्रेश तसेच अनुभवी उमेदवारांना संधी आहे.

recruit.nagpur@hcl.comवर इच्छूक उमेदवारांनी अर्ज करावेत असे आवाहन एचसीएल टेक्नॉलॉजीने केले आहे.

HCL recruitment for fresher engineers, Read to know more

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात