न्यायाधीश आनंद यांना हत्येसाठी जाणीवपूर्वक धडक: सीबीआयची न्यायालयात माहिती

वृत्तसंस्था

रांची – धनबादचे न्यायाधीश उत्तम आनंद यांना जाणीवपूर्वक धडक मारण्यात आली. त्यांच्या हत्येचे कारस्थान करणाऱ्यांपर्यंत सीबीआय पोचेल, अशी माहिती सीबीआयने झारखंडच्या उच्च न्यायालयाला दिली. Judes murder is deliberate act says CBI

झारखंड उच्च न्यायालयात उत्तम आनंद यांच्या हत्येप्रकरणाची आज सुनावणी झाली. यावेळी सीबीआयच्या संयुक्त संचालकांनी आपली बाजू मांडली. ते म्हणाले, की सीबीआय सर्व बाजूंनी तपास करत आहे. तपास सुरू आहे.अटकेत असलेले दोन्ही आरोपी मोबाईल चोर आहेत. ते प्रत्येकवेळी वेगळीच माहिती देऊन तपासाला नवीन वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु सीबीआयचे वीस अधिकारी त्यांचा कसून तपास करत आहेत.

परंतु न्यायाधीश उत्तम आनंद यांना मुद्दामपणे धडक मारली आहे. असे कारस्थान रचणाऱ्यांपर्यंत सीबीआय लवकरच पोचेल, असा विश्वाूस व्यक्त केला.

Judes murder is deliberate act says CBI

महत्त्वाच्या बातम्या