सुधीर मुनगंटीवार यांचे महाविकास आघाडी सरकारवर कडाडून टीका, मला अर्थमंत्री केल्यास,वीस रुपयांनी पेट्रोलचे दर कमी करतो

विशेष प्रतिनिधी

पुणे : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पेट्रोलच्या वाढत्या किंमतीवर आपले मत व्यक्त केले आहे. राज्यातील जनतेला स्वस्तात स्वस्त पेट्रोल देण्याची इच्छाशक्ती राज्याने दाखवली तर राज्यात पेट्रोलच्या किंमती 20 रुपयांनी कमी होऊ शकतात, असे मत त्यांनी सरकारनामाला दिलेल्या मुलाखतीत मांडले आहे.

Former minister sudhir mungantivar says If i would be minister of economy, i will reduce the rate of petrol by twenty rupees

महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना सरकारकडे नियोजन, अभ्यास आणि इच्छाशक्तीची कमतरता आहे असे त्यांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे ते म्हणतात की, ‘पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतीला केंद्र सरकारला जबाबदार धरणे हे चुकीचे असून, राज्य सरकारने पेट्रोल डिझेलचा समावेश वस्तू व सेवा करात केल्यास पेट्रोलच्या किंमती कमी होऊ शकतात.’


Petrol-Diesel Price Drop : खूप दिवसांनी कमी झाले पेट्रोल-डिझेलचे दर, असे चेक करा तुमच्या शहरातील दर


पेट्रोलवर लावण्यात आलेल्या करातून केंद्र सरकारला प्रत्येक लिटरमागे 32 रुपये मिळतात तर राज्य सरकारलाही तितकेच रुपये मिळतात. केंद्राला मिळालेल्या करातून केंद्र सरकार कडून रस्ते विकास, शेतकऱ्यांचे अनुदान तसेच पंचवार्षिक योजना अंतर्गत राज्यांना निधी दिला जातो. तर राज्य सरकार पेट्रोल डिझेलवरील कर कमी करू शकतो, फक्त त्या सरकारची इच्छा असायला हवी असे खोचक विधान त्यांनी केले आहे.

आपल्या वक्तव्यामध्ये पुढे ते म्हणतात की,’जर मला अर्थमंत्री होऊ दिले तर मी वीस रुपयांनी पेट्रोलच्या किमती कमी करून दाखवेन. महाविकास आघाडी सरकारला निर्णय घेता येत नसल्याने पेट्रोलचे दर चढले असल्याची टीका त्यांनी यावेळी केली आहे.’

Former minister sudhir mungantivar says If i would be minister of economy, i will reduce the rate of petrol by twenty rupees

 

महत्त्वाच्या बातम्या