Petrol-Diesel Price Drop After many days, Check today's price in your city

Petrol-Diesel Price Drop : खूप दिवसांनी कमी झाले पेट्रोल-डिझेलचे दर, असे चेक करा तुमच्या शहरातील दर

Petrol-Diesel Price Drop : सरकारी तेल कंपन्यांकडून 24 दिवसांनंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यात आले आहेत. आज डिझेल 17 आणि पेट्रोल 18 पैशांनी स्वस्त झाले आहे. दिल्लीत पेट्रोलची किंमत 90.99 रुपये आहे, तर डिझेलची किंमत 81.30 रुपये प्रतिलिटर आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत 97.40 रुपये, तर डिझेलची किंमत 88.42 रुपये प्रतिलिटर आहे. Petrol-Diesel Price Drop After many days, Check today’s price in your city


विशेष प्रतिनिधी

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांकडून 24 दिवसांनंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यात आले आहेत. आज डिझेल 17 आणि पेट्रोल 18 पैशांनी स्वस्त झाले आहे. दिल्लीत पेट्रोलची किंमत 90.99 रुपये आहे, तर डिझेलची किंमत 81.30 रुपये प्रतिलिटर आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत 97.40 रुपये, तर डिझेलची किंमत 88.42 रुपये प्रतिलिटर आहे.

अशा आहेत प्रमुख शहरांमधील किमती

दिल्ली

डिझेल 81.30 रु. प्रति लिटर, पेट्रोल 90.99 प्रति लिटर

कोलकाता

डिझेल 84.18 रु. प्रति लिटर, पेट्रोल 91.18 रु. प्रति लिटर

मुंबई

डिझेल 88.42 रु. प्रति लिटर, पेट्रोल 97.40 रु. प्रति लिटर

चेन्नई

डिझेल 86.29 रु. प्रति लिटर, पेट्रोल 92.95 रु. प्रति लिटर

 

रोज सकाळी सहा वाजता बदलतात दर

दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजेपासून लागू आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.

असे चेक करा तुमच्या शहरातील दर

या मानकांच्या आधारे तेल कंपन्या दररोज पेट्रोल दर आणि डिझेल दर निश्चित करण्याचे काम करतात. आपल्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर तुम्हालाही जाणून घेता येतील. एसएमएसद्वारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत तुम्हाला जाणून घेता येते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार तुम्हाला RSP आणि आपला शहराचा कोड लिहून तो 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहरासाठी कोड वेगळा आहे, जो तुम्हाला आयओसीएल वेबसाइटवरून मिळेल.

Petrol-Diesel Price Drop After many days, Check today’s price in your city

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*