राज्यातील घोटाळ्यांच्या महामेरूंचे भ्रष्टाचार बाहेर काढणे, हाच आमचा एककलमी कार्यक्रम – दरेकर

विशेष प्रतिनिधी

मुंबई – मुंबै बँकेच्या विरोधात चौकशी करण्याचा राज्य सरकारचा निर्णय म्हणजे पुन्हा शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रकार आहे. आता राज्यातील घोटाळ्यांच्या महामेरूंचे भ्रष्टाचार बाहेर काढणे, हाच आमचा एककलमी कार्यक्रम राहील, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते व मुंबै बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.Prvain Darekar targets Govt.

दरेकर म्हणाले, राज्य सरकारच्या विरोधात विविध प्रकरणांत आरोप व टीका केल्यामुळेच सरकारने केवळ सूडाने व द्वेषापोटी कारवाईचा निर्णय घेतला आहे; परंतु सरकारने कितीही आकसापोटी कारवाई केली, तरी आमचा आवाज ते दडपू शकत नाही.राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील जिल्हा बँका आणि सहकारी संस्थांची रीतसर तक्रार सर्व तपास यंत्रणांकडे आम्ही करणार आहोत. मुंबै जिल्हा बँकेविरुद्ध यापूर्वीच सहकार कायद्याच्या कलम ८३ व ८८ ची चौकशी झाली. त्याचा कम्पलायन्स रिपोर्ट देण्यात आला आहे.

तो रिपोर्ट सहकार खात्याने स्वीकारलासुद्धा आहे. तसेच यासंदर्भात जी केस होती, ती सी समरी म्हणून दाखल झाली; परंतु सरकारवर टीका करणाऱ्या दरेकर यांना कुठल्या चौकशीच्या फेऱ्यात अडकवता येते का, यासाठी हा एक केविलवाणा व दुर्दैवी प्रयत्न असल्याचा आरोपही दरेकर यांनी केला.

Prvain Darekar targets Govt.

महत्त्वाच्या बातम्या