PM MODI US VISIT : अमेरिका दौऱ्यात ‘डिजिटल इंडिया’चा नारा;पंतप्रधान मोदींनी घेतली Qualcomm च्या सीईओंची भेट; नवीन व्यापारी संधी शोधणार-बैठकीत एकमत


वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : अमेरिका दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Qualcomm चे सीईओ क्रिस्टियानो अमोन (Cristiano Amon) यांची भेट घेत डिजिटल इंडियाला ( PM Modi welcomes new investment in India ) एक पाऊल पुढे घेऊन जाण्याचा संकल्प केला.Qualcomm कंपनीची भारतात मोठी गुंतवणूक असून रिसर्च अँड डेव्हलपमेंटसह अनेक क्षेत्रात ही कंपनी कार्यरत आहे.PM MODI US VISIT: ‘Digital India’ slogan during US tour; PM Modi meets Qualcomm CEOs; Consensus on meeting new business opportunities

‘डिजिटल इंडिया’-

या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘डिजिटल इंडिया’ची माहिती देत नव्या गुंतवणूक प्रस्तावांचं स्वागत केलं. काय म्हणाले अमोन भारत ही जगातील सर्वोत्तम बाजारपेठ असून भविष्यात भारताला मोठ्या संधी असल्याचं Qualcomm चे सीईओ क्रिस्टियानो अमोन यांनी म्हटलं आहे. भारतासोबत काम करण्यासाठी आपण नेहमीच उत्सुक असल्याचं त्यांनी पंतप्रधान मोदींना सांगितलं.



भारत ही एक सर्वोत्तम बाजारपेठ आहेच, मात्र त्याचवेळी एक सक्षम निर्यातदार देश हीदेखील भारताची ओळख असल्याचं त्यांनी म्हटलं. भारताची अनेक क्षेत्रात निर्यात करण्याची क्षमता अफाट असून त्यामुळे भारताचं भवितव्य उज्ज्वल असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

भारतानं देशांतर्गत गरजा लक्षात घेऊन उत्पादन तर करावंच, मात्र त्याचसोबत इतर देशांच्या गरजा भागवण्याचंही काम करावं, असा सल्ला त्यांनी दिला. एकत्र काम करण्याचा प्रस्ताव भारतासोबत सेमी-कंडक्टरच्या क्षेत्रात एकत्र काम करायला आवडेल, असा प्रस्ताव त्यांनी दिला.

त्याचप्रमाणे इतर क्षेत्रातील गुंतवणूक आणि आगामी 5G नेटवर्कच्या मुद्द्यावरही या भेटीत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. पंतप्रधानांनी दिलं आश्वासन Qualcomm ला भारतात ज्या ज्या गोष्टींची गरज असेल, त्या पुरवण्यासाठी पुढाकार घेण्याचं आश्वासन पंतप्रधान मोदींनी अमोन यांना दिलं.

भारतात अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आकार घेत असून त्याबाबत एकत्रित काम करण्याचा मनोदय पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला. Qualcomm नं नाविक प्रकल्पात जसा सहभाग घेतला, तसंच सहकार्य 5G आणि इतर बाबींसाठी द्यावं, असं ते म्हणाले.

नव्या ड्रोन पॉलिसीबाबतही त्यांनी अमोन यांना माहिती दिली. बदललेल्या धोरणाचा Qualcomm ला चांगलाच फायदा करून घेणं शक्य असल्याचं त्यांनी सांगितलं. परस्पर सहकार्यानं नव्या व्यापारी संधी शोधण्यावर या बैठकीत एकमत झालं.

PM MODI US VISIT: ‘Digital India’ slogan during US tour; PM Modi meets Qualcomm CEOs; Consensus on meeting new business opportunities

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात