सरकारने निवडणुकीची थट्टा मांडली, प्रभागरचनेचा उद्देश सांगावा, लोकांनी एकावेळी किती बोटं दाबायची? नाशकात राज ठाकरेंचा हल्लाबोल

Raj Thackeray Criticizes Thackeray government over ward system in local body elections decision

Raj Thackeray Criticizes Thackeray government : शहराच्या दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली आहे. महाविकासआघाडी सरकारने घेतलेल्या प्रभागरचोच्या निर्णयावर त्यांनी टीकास्त्र सोडले. राज ठाकरे म्हणाले की, प्रभागांची तोडफोड करून आपल्याला हवे तसे प्रभाग करणे योग्य नाही. लोकांनी एकाऐवजी तीन-तीन बोटं का दाबायची? निवडणूक आयोगाने दखल घ्यावी, असेही ते म्हणाले. Raj Thackeray Criticizes Thackeray government over ward system in local body elections decision


विशेष प्रतिनिधी

नाशिक : शहराच्या दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली आहे. महाविकासआघाडी सरकारने घेतलेल्या प्रभागरचोच्या निर्णयावर त्यांनी टीकास्त्र सोडले. राज ठाकरे म्हणाले की, प्रभागांची तोडफोड करून आपल्याला हवे तसे प्रभाग करणे योग्य नाही. लोकांनी एकाऐवजी तीन-तीन बोटं का दाबायची? निवडणूक आयोगाने दखल घ्यावी, असेही ते म्हणाले.

पत्रकार परिषदेत राज ठाकरे म्हणाले की, कायदे वेगवेगळे का? २-३-४ प्रभाग हा खेळ कसला? उद्या २-२ आमदारांचा, खासदारांचा प्रभाग करणार आहेत का? ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेला प्रभाग नाही, महापालिकेला प्रभाग का? यांच्या फायद्यासाठी हे आहे का? आम्ही आमचे मार्ग अवलंबू, पण आता लोकांनी विरोध करावा, लोकांनी कोर्टात गेलं पाहिजे, निवडणूक आयोगाकडे गेलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

यांनी निवडणुकीची थट्टा करून टाकली

राज ठाकरे पुढे म्हणाले की, कुठलाही नगरसेवक काम करू देत नाही, प्रभागामध्ये कामे होत नाहीत. उद्या लोकांनी ठरवलं नगरसेवकाला भेटायचं, तर कोणत्या नगरसेवकाला भेटायचं? यांनी निवडणुकीची थट्टा करून टाकली आहे गृहीत धरणं सुरू आहे, त्याविरोधात लोकांनी कोर्टात जावं, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.

सरकारने प्रभागरचनेचा उद्देश सांगावा

राज म्हणाले की, आम्ही बोललं की राजकीय वास येतो. चार प्रभाग होते, त्याचे तीन का, दोन होते त्याचे चार प्रभाग का, सरकारने नेमका आपला उद्देश सांगावा. गेल्या दहा वर्षांपासून हा खेळ सुरू आहे. आपण फक्त उघड्या डोळ्याने बघत राहायचं का?, असा प्रश्नही उपस्थित करून ते म्हणाले की, किती वैयक्तिक पातळीवर जायचं कळत नाही, साप काय बेडूक काय, सगळा बेडूक करून टाकलाय कानफाटात काय मारू वगैरे, कुठल्या पदांवर आपण बसलोय हे ध्यानात ठेवायला हवं. हे सगळेच जण एकमेकांना फोन करून सांगतात की काय कळत नाही, की आपण मुख्य प्रश्न बाजूला ठेवून या विषयांवर बोलू.. मूळ प्रश्नांवर दुर्लक्ष करण्यासाठीच हे सुरू आहे काय? टीव्ही, न्यूज चॅनलवरही तेच, असंही ते म्हणाले.

राज पुढे म्हणाले की, सरकारच्या कोरोनाच्या लाटा थांबतच नाहीत. टोलवरून आम्ही आंदोलनं केली, अनेक टोल बंद झाले. सरकार आणि विरोधक येतात तेव्हा त्यांना तुम्ही प्रश्न विचारा. शरियतसारखा कायदा आणा, त्याशिवाय सुधारणार नाहीत. त्याचं कारण म्हणजे भीती नाही उरली कशाची? माजी गृहमंत्र्यांना ईडी बोलावते, ते जात नाहीत, ते ईडीला येडा समजतात, असा टोलाही त्यांनी लगावला.

Raj Thackeray Criticizes Thackeray government over ward system in local body elections decision

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात