रजत अरोरानी ‘थलाइवी’ चा सिक्वल येणार असल्याचे केले जाहीर

विशेष प्रतिनिधी

मुंबई: कंगना राणावत या बिनधास्त अभिनेत्रीचा ‘थलाइवी’ प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे.जयललिता यांच्या जीवनावर आधारित चित्रपट होता. या चित्रपटाचा शेवट जयललिता मुख्यमंत्री होतात या प्रसंगात होता.  जयललिता यांची पुढील कारकीर्द पण बघायची असल्याने या चित्रपटाचा दुसरा भाग बनवला जावा असे प्रेक्षकांना वाटत होते.

Thalaivi Sequel update, Post CM journey of Jaylalita to be shown in the sequel says writer Rajat Arora

जयललिता तामिळनाडूच्या दीर्घकाळ मुख्यमंत्री होत्या. त्यांच्या कारकिर्दीतील अनेक कामे प्रशंसनीय आहेत व बरेच काही सांगता येईल. रजत अरोरा याबाबत बोलताना म्हणाले की, आम्हाला एक मनोरंजन विश्वातील मुलगी मुख्यमंत्रीच्या पदापर्यंत कशी पोहोचते हे दाखवायचे होते. आपण या सिनेमाचे पोस्टर पाहिले तर आपल्याला दिसेल की आम्ही “सिनेमाकडून मुख्यमंत्री पर्यंत” असेच लिहिले होते. रजत पुढे म्हणाले की, “जयललिता यांची राजकीय कारकीर्द पुढे २०-३० वर्षापर्यंतची आहे, ती थोडक्यात दाखवणे शक्य नव्हते. म्हणूनच आम्ही ही कथा दुसरा भाग करून दाखवणार आहोत. मला बरेच लोक असं म्हणाले की, तुम्ही जयललितांचा जीवनपट अर्धाच दाखवला पण लोकांना तो पूर्ण बघायला आवडेल. याबाबत मी कंगनाबरोबर बोललो आहे. थलाइवीच्या पूर्ण टिम बरोबर याबाबत आम्ही चर्चा करणार आहोत”.


ना दीपिका, ना करिना सीतेच्या भूमिकेत झळकणार क्वीन कंगना, लेखक मनोज मुंताशीर यांचा दुजोरा


कंगना राणावतच्या कारकीर्दीतील ‘थलाईवी’ हा एक संस्मरणीय चित्रपट ठरला आहे. प्रेक्षक व सिनेमा परिक्षकांना हा चित्रपट आवडला आहे. मागील काही वर्षात कंगना राणावत आपल्या चित्रपटांचे प्रमोशन करत नसे. मात्र ‘थलाइवी’ च्या प्रमोशनसाठी ती कपिल शर्माच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. आता थलाइवीचा दुसरा भाग ही टिम कसा बनवते ते पाहू. प्रेक्षक तर या दुसऱ्या भागाची उत्सुकतेने वाट पहात आहेत.

Thalaivi Sequel update, Post CM journey of Jaylalita to be shown in the sequel says writer Rajat Arora

 

महत्त्वाच्या बातम्या