माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाचा दिलासा नाहीच

विशेष प्रतिनिधी

मुंबई – अडचणीत सापडलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. देशमुख यांच्या याचिकेवर आता २९ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, ईडीने याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.Anil Deshmukh gets in trouble

पोलिस अधिकारी परमबीरसिंग यांनी देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. याप्रकरणी ईडीने देशमुख यांना आतापर्यंत पाच समन्स बजावले असून चौकशीला हजर राहण्यास सांगितले आहे. मात्र, देशमुख यांनी ईडीसमोर हजेरी लावलेली नाही. समन्सविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे.ईडीच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता नवी दिल्लीतून बाजू मांडणार आहेत. त्यामुळे ही सुनावणी आॅनलाइन घ्यावी, अशी मागणी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी केली. या मागणीला देशमुख यांच्या वतीने ॲड. अनिकेत निकम यांनी आणि ॲड. विक्रम चौधरी यांनी विरोध केला.

ईडी याचिकेची सुनावणी होऊ नये म्हणून विलंब करीत आहे. केवळ दबाव निर्माण करून ईडी नाहक विलंब करीत आहे. त्यामुळे न्यायालयाने आज सुनावणी घ्यावी आणि देशमुख यांना दिलासा द्यावा, अशी मागणी चौधरी यांनी केली.

Anil Deshmukh gets in trouble

महत्त्वाच्या बातम्या