Interesting Facts Behind Sensex on 60 thousand, Know Historical data Of Bombay Stock Market

सेन्सेक्स 60 हजारी होण्याची रंजक कहाणी : मोदी पहिल्यांदा पंतप्रधान होताच 25 हजारांवर, दुसऱ्यांदा 40 हजारांवर गेला होता निर्देशांक

Interesting Facts Behind Sensex : शेअर बाजाराने शुक्रवारी 60 हजारांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला. अवघ्या 31 ट्रेडिंग डेमध्ये 55 वरून 60 हजारांवर झेप घेतली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला 21 जानेवारी रोजी सेन्सेक्सने प्रथमच 50 हजारांचा टप्पा गाठला होता, परंतु दिवसाच्या अखेरीस तो कमी होत गेला. Interesting Facts Behind Sensex on 60 thousand, Know Historical data Of Bombay Stock Market


विशेष प्रतिनिधी

मुंबई : शेअर बाजाराने शुक्रवारी 60 हजारांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला. अवघ्या 31 ट्रेडिंग डेमध्ये 55 वरून 60 हजारांवर झेप घेतली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला 21 जानेवारी रोजी सेन्सेक्सने प्रथमच 50 हजारांचा टप्पा गाठला होता, परंतु दिवसाच्या अखेरीस तो कमी होत गेला.

1 फेब्रुवारी रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्पीय भाषण वाचत असताना सेन्सेक्स वाढत होता. या संपूर्ण आठवड्यात मुंबई शेअर बाजार (बीएसई) निर्देशांक सेन्सेक्स 4445.86 अंकांनी वाढला. अर्थसंकल्पाच्या दोन दिवसांनी, म्हणजे 3 फेब्रुवारीला, सेन्सेक्स प्रथमच 50 हजाराच्या वर बंद झाला. त्यानंतर ते 4 आणि 5 फेब्रुवारीला फक्त 50 हजाराच्या वर बंद झाला.

सेन्सेक्सने सुरुवात होऊन 35 वर्षे लोटली आहेत. याची सुरुवात 1986 मध्ये झाली. तेव्हापासून तो भारताच्या अर्थव्यवस्थेची कथा बनला आहे. सुरुवातीला त्याचा बेस 100 ठेवण्यात आला होता. चार वर्षांनंतर तो चार अंकांवर पोहोचला. तर पाच अंकी होण्यासाठी त्याला 20 वर्षे लागली.

अशी झाली होती सेन्सेक्सची सुरुवात

सेन्सेक्स 1986 मध्ये लॉन्च झाला, तेव्हा त्याचे आधार वर्ष 1978-79 असे ठेवले गेले. आणि बेस 100 पॉइंट करण्यात आला. जुलै 1990 मध्ये हा आकडा 1000 अंकांवर पोहोचला. 1991च्या आर्थिक उदारीकरणानंतर सरकारने एफडीआयचे दरवाजे उघडले आणि व्यवसाय करण्याचा कायदा रद्द केला. बाजारमूल्य आणि सेवाभिमुख अर्थव्यवस्थेचे नियमन यामुळे सेन्सेक्समधील वेग वाढला.

सुरुवातीचे बदल…

सर्वप्रथम, सेवा उद्योगातील बँका, दूरसंचार आणि आयटी क्षेत्रातील कंपन्यांचा यात समावेश करण्यात आला. यानंतर 90च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि 2000 च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात आयटी कंपन्यांमध्ये वेगाने होणारा विकास पाहता जुन्या कंपन्यांच्या जागी टीसीएस आणि इन्फोसिसचा समावेश करण्यात आला.

उदारीकरणापासून भारतातील मोठ्या कंपन्या देशांतर्गत विक्रीवर जास्त अवलंबून नाहीत. या सर्व कंपन्या निर्यातीद्वारे व्यवसाय वाढवत आहेत. त्याचबरोबर आयटी क्षेत्रातील आउटसोर्सिंगमुळे इन्फोसिससारख्या कंपन्यांना फायदा झाला आहे. टाटासारख्या ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपन्यांनी यूकेसारख्या विकसित बाजारात प्रवेश केला आहे.

सर्वप्रथम 10 हजारी केव्हा झाला सेन्सेक्स?

फेब्रुवारी 2006 मध्ये सेन्सेक्सने सर्वात प्रथम 10,000 चा आकडा पार केला. याचे एक कारण जागतिक कमोडिटी मार्केटमधील तेजीदेखील होते. यानंतरही सेन्सेक्समध्ये वाढ होण्याचा कल कायम राहिला. आक्रमक खरेदीमुळे 2006 आणि 2007 मध्ये सेन्सेक्स वाढतच गेला. जागतिक बाजारपेठेत रोख प्रवाह वाढल्यामुळे सेन्सेक्सने डिसेंबर 2007 मध्ये 20 हजारांचा टप्पा गाठला.

2008च्या मंदीचा बसला होता फटका

22 महिन्यांत जी बाजारपेठ 10 हून 20 हजारांपर्यंत पोहोचली होती, ती 2008 च्या आर्थिक मंदीमध्ये कोलमडली आणि पुन्हा दहा हजारांच्या जवळ पोहोचली. 2009 मध्ये सत्यम घोटाळ्यानंतर यात आणखी घट झाली. 2009 च्या लोकसभा निवडणुका आणि यूपीएच्या विजयानंतर तो पुन्हा वेगाने वाढू लागला आणि नोव्हेंबर 2010 मध्ये सेन्सेक पुन्हा 21 हजारांच्या आकड्यावर पोहोचला.

मोदींच्या पहिल्या विजयाला सेन्सेक्सची 25 हजारी सलामी

लोकसभा निवडणुकीचे निकाल 16 मे 2014 रोजी जाहीर झाले. नरेंद्र मोदी पहिल्यांदाच सत्तेवर आले. सेन्सेक्सनेही मोदी सरकारचे स्वागत केले आणि प्रथमच 25 हजारांचा आकडा गाठला. यानंतर दहा महिन्यांनीच 4 मार्च 2015 रोजी सेन्सेक्सने 30 हजारांचा आकडा गाठला.

सप्टेंबर 2016 मध्ये, जगभरातील बाजारातील मंदीची चिन्हे आणि चीनच्या खराब आर्थिक अंदाजांमुळे सेन्सेक्स पुन्हा एकदा 25 हजारांच्या खाली आला. यानंतर बिहार निवडणूक निकाल आणि नोटाबंदीदरम्यान बीएसईला मोठा धक्का बसला. नोटाबंदीच्या दुसऱ्या दिवशी 9 नोव्हेंबर 2016 रोजी सेन्सेक्स 1689 अंकांनी घसरला होता.

मोदी सरकारच्या दुसऱ्या विजयावेळी सेन्सेक्स 40 हजारी

23 मे 2019 रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आले. बाजारानेही निकालाचे स्वागत करत पहिल्यांदा 40 हजारांचा टप्पा गाठला. 4 डिसेंबर 2019 रोजी बाजाराने 45 हजारांचा आकडा गाठला होता. यानंतर कोरोनाने हाहाकार उडवला बाजाराच्या घसरणीला सुरुवात झाली.

23 मार्च 2020 रोजी म्हणजेच जनता कर्फ्यूच्या दुसऱ्या दिवशी बाजार 25,981 एवढ्या नीचांकावर पोहोचला. म्हणजेच, चार महिन्यांपेक्षा कमी कालावधीत सुमारे 20 हजार अंकांची घट झाली, परंतु लॉकडाऊनदरम्यान बाजार हळूहळू वाढायला लागला.

2021 मध्ये पहिल्यांदा 50 हजारांचा टप्पा

2021च्या सुरुवातीच्या महिन्यात सेन्सेक्सने पुन्हा मोठी उडी घेतली आहे. यावेळी 50 हजारांच्या आकड्याला स्पर्श केला. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे अमेरिकेत नवीन राष्ट्राध्यक्ष बायडेन सत्तेवर आले. यापूर्वी कोरोना महामारीच्या वेळी लॉकडाऊनदरम्यान अनेक देशांची अर्थव्यवस्था कोलमडली होती, परंतु लस आल्यानंतर सेन्सेक्सने पुन्हा वेग घेतला.

Interesting Facts Behind Sensex on 60 thousand, Know Historical data Of Bombay Stock Market

Interesting Facts Behind Sensex on 60 thousand, Know Historical data Of Bombay Stock Market

महत्त्वाच्या बातम्या