“देहदंडाची शिक्षा व्हावी, म्हणजे परत कोणाची हिंमत होणार नाही!”, राज्यातील अत्याचाराच्या घटनांवर पंकजा मुंडेंचा संताप

BJP Leader Pankaja Munde Criticized MVA Govt Over Increased Rape Cases In Maharashtra

Pankaja Munde : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ दिसून येत आहे. यावरून सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे, त्याचबरोबर राजकीय वातावरणही तापलेले आहे. पुण्यातील अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार, मुंबईतील साकीनाका प्रकरण, नागपूर, परभणी, सातारा, कल्याण आणि आता डोंबिवतील सर्वात धक्कादायक सामूहिक बलात्काराच्या घटनेने अवघ्या राज्यात खळबळ उडाली आहे. याच विषयावर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. BJP Leader Pankaja Munde Criticized MVA Govt Over Increased Rape Cases In Maharashtra


विशेष प्रतिनिधी

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ दिसून येत आहे. यावरून सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे, त्याचबरोबर राजकीय वातावरणही तापलेले आहे. पुण्यातील अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार, मुंबईतील साकीनाका प्रकरण, नागपूर, परभणी, सातारा, कल्याण आणि आता डोंबिवतील सर्वात धक्कादायक सामूहिक बलात्काराच्या घटनेने अवघ्या राज्यात खळबळ उडाली आहे. याच विषयावर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

देहदंडाची शिक्षा व्हावी

पंकजा मुंडे म्हणाल्या की, “आपल्या राज्यात, देशात आणि संस्कृतीत महिलांना पूजनीय स्थान देण्यात आलंय. माझ्या पहिल्या भाषणापासून मी महिला अत्याचारावर भाष्य करतेय. महिला अत्याचारामधील घटनांमध्ये शिक्षेचं प्रमाण वाढावं, त्यातही अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला तर त्यांना देहदंडाची शिक्षा करावी अशी मागणी आम्ही लावून धरली होती. पण आजचं चित्र खूप विदारक दिसतंय.”

…परत कोणी हिंमत करणार नाही

त्या पुढे म्हणाल्या की, “या घटनांनंतर संताप व्यक्त केला जातो, पण खरं काम पोलिसांचं आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट तयार झाले असून पोलिसांच्या यंत्रणा तत्काळ राबवल्या पाहिजेत, जेणेकरून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल. अशी शिक्षा झाली पाहिजे की परत कोणी महिलेला स्पर्श करण्याची आणि त्रास देण्याची, वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करणार नाही,” असंही त्या म्हणाल्या.

करुणा शर्मा प्रकरणावर

करुणा शर्मा यांना झालेल्या अटकेनंतर ट्वीट करत पंकजा मुंडे यांनी चुकीच्या लोकांच्या हातात ताकद असल्याचे म्हटले होते. यावर त्या म्हणाल्या की, “जेव्हा आपण राजकारणात पराक्रमी या शब्दाशी जोडलो जातो आणि तो जेव्हा हात बांधतो तेव्हा व्यवस्था कोलमडते. म्हणजे चुकीच्या घटना घडल्याने व्यवस्था कोलमडत नाही, तर चुकीच्या घटनांवर आपण ज्या पद्धतीने व्यक्त होतो त्यामुळे ती कोलमडते. त्यामुळे मला आताचं राजकारण सभ्य म्हणावं वाटतं नाही. राजकारणाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन फारसा सकारात्मक नाही. त्यात आपण राजकीय संस्कृतीचे ट्रेंड जे निर्माण होत आहेत ते भविष्यासाठी फारसे चांगले नाहीत,” असंही त्या म्हणाल्या.

डोंबिवली प्रकरणात 33 पैकी 28 आरोपींना अटक

संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या डोंबिवलीतील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्काराच्या घटनेप्रकरणी आतापर्यंत 33 पैकी 28 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीच्या प्रमुख सोनाली ढोले यांनी वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. त्या म्हणाल्या की, अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी दोन अल्पवयीन आहेत, पीडितेची प्रकृती स्थिर आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पीडिता आरोपीला ओळखत होती. याशिवाय याप्रकरणी आतापर्यंत कोणतेही राजकीय संबंध आढळले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

BJP Leader Pankaja Munde Criticized MVA Govt Over Increased Rape Cases In Maharashtra

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात