“भारताला हिंदूराष्ट्र घोषित करा, अन्यथा जलसमाधी”; अयोध्येतील धर्मसंसदेत संत परमहंस यांची घोषणा


वृत्तसंस्था

अयोध्या :“भारताला हिंदूराष्ट्र घोषित करा, अन्यथा २ ऑक्टोबरला शरयूत जलसमाधी घेणार आहे”; अशी घोषणा संत परमहंस यांनी केली आहे. “Declare India a Hindu Nation, otherwise Jalasamadhi”; Saint Paramahansa’s announcement in the Parliament of Ayodhya

अयोध्येतील तपस्वी छावणीत आज धर्मसंसद आयोजित केली होती. त्यावेळी संत परमहंस यांनी ही घोषणा केली आहे.यापूर्वी त्यांनी हिंदूराष्ट्राबाबत पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना पत्र पाठवले होते. त्यानंतर आत्मदहन करण्याची घोषणा केली होती. मात्र, चितेवर बसत असतानाच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.


Hum Hindustani : स्वातंत्र्यगीत झाले रिलीज, अमिताभ बच्चनपासून सोनाक्षी सिन्हापर्यंत ‘हे’ दिग्गज झाले सामील


१ ऑक्टोबर रोजी देशातील नागरिकांची एक मोठी सनातन धर्मसंसद आयोजित होईल. यामध्ये भारताला हिंदूराष्ट्र बनवण्यावर चर्चा होईल. संत परमहंस यांनी सांगितले की, यावर जर केंद्र सरकारने काही निर्णय घेतला नाही तर २ ऑक्टोबर रोजी मी शरयू नदीमध्ये जलसमाधी घेईन.

आता जसजशी २ ऑक्टोबर ही तारीख जवळ येत आहे तसतशा संत परमहंस यांच्या हालचालींना वेग आला आहे.

“Declare India a Hindu Nation, otherwise Jalasamadhi”; Saint Paramahansa’s announcement in the Parliament of Ayodhya

 

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात