वृत्तसंस्था
नांदेड : महाराष्ट्रासह गुजरातला परतीचा पाऊस झोडपून काढणार आहे. हा पाऊस जाता जाता एखादा तडाखा देण्याची शक्यता आहे.Return Rain to Maharashtra and Gujarat, Today, tomorrow the torrent will fall; scientist’s warning
भारतीय हवामान विभागाचे वैज्ञानिक कृष्णानंद ओसलीकर यांनी हा इशारा ट्विटरवर दिला.आज रविवारी नांदेड जिल्ह्यात पावसाने लावलेल्या हजेरीनंतर सर्वत्र पाणीच पाणी झाले. यावरून परतीचा पाऊस झोडपणारच अशी चिन्हे दिसत आहेत. नदी काठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.
कृष्णानंद ओसलीकर यांच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात चक्रवाट वावटळ तयार होणार आहे. बंगालच्या खाडीत प्रभावाचे क्षेत्र तयार झाले आहे. ते ओडीसा आणि आंध्र प्रदेशच्या समुद्र तटांवर धडक मारणार आहे. याचा प्रभाव मुंबई, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात दिसणार आहे. अत्यंत जास्त वेगाने वारे वाहणार आहेत. हा प्रभाव २७ आणि २८ सप्टेंबर रोजी जास्त दिसणार आहेत. यासाठी समुद्रकाठी राहणाऱ्या लोकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
आज मुसळधार पावसाचा अंदाज ..
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार २७ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, सातारा, रायगड, रत्नागिरी, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, गडचिरोलीसह एकूण ११ जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. सोमवारी राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील रायगड, ठाणे, पालघर, धुळे आणि जळगाव जिल्ह्यांना रेड अलर्ट तर पुणे, नाशिक, रत्नागिरी, औरंगाबाद, नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यांना औरेंज अलर्ट घोषित केला आहे.आज नांदेड जिल्ह्यात दुपारनंतर पावसाने रौद्ररूप धारण केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App