Maharashtra Heavy Rain in areas like Thane Palghar Jalgaon Chalisgaon and landslide in Aurangabad Kannad Ghat

Maharashtra Heavy Rain : मुंबईसह महाराष्ट्रभर मुसळधार पाऊस, चाळीसगाव परिसरात पाणीच पाणी, कन्नड घाटात दरड कोसळली

Maharashtra Heavy Rain :  मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील 3-4 दिवस राज्यभरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील 3-4 तासांसाठी अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. रात्रीपासून मुंबईसह मुंबईच्या आसपासच्या भागात मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई व्यतिरिक्त जळगाव चाळीसगाव परिसर, औरंगाबादमधील कन्नड घाटाजवळ पावसाने कहर केला आहे. Maharashtra Heavy Rain in areas like Thane Palghar Jalgaon Chalisgaon and landslide in Aurangabad Kannad Ghat


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील 3-4 दिवस राज्यभरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील 3-4 तासांसाठी अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. रात्रीपासून मुंबईसह मुंबईच्या आसपासच्या भागात मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई व्यतिरिक्त जळगाव चाळीसगाव परिसर, औरंगाबादमधील कन्नड घाटाजवळ पावसाने कहर केला आहे. नदी -नाल्यांना पूर आला आहे. कन्नड घाटात दरडही कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

मुंबई- ठाणे आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून पुढील ३-४ तास महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले होते. कांदिवली, बोरिवली, मालाड, गोरेगाव, अंधेरीसह अनेक भागात पावसामुळे वाहतूक मंदावली आहे. पुढील तीन ते चार दिवस भारतीय हवामान विभागाने मुंबई आणि आसपासच्या भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम महामार्गावर पूर्ण अंधार आहे. पुढील तीन ते चार तास या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यात पश्चिम किनारपट्टीवर पावसाची तीव्रता प्रचंड वाढली आहे.

चाळीसगावमध्ये प्रचंड पाऊस, 6 गावांमध्ये पूर परिस्थिती

जळगावच्या चाळीसगाव परिसरात अतिवृष्टी झाली आहे. घरे, दुकाने पाण्याखाली गेली असून नद्या आणि नाल्या दुथडी भरून वाहत आहेत. सर्वत्र फक्त पाणीच दिसत आहे. कोडगाव आणि वलथन धरणे तीतूर डोंगरी नदीच्या मुळाजवळ भरली होती. नदीच्या पुरामुळे अनेक घरांना, दुकानांना फटका बसला. अनेक घरांमध्ये पाणी शिरले. दोन्ही पुलांवर पाणी वाहत आहे. यामुळे चाळीसगाव ते औरंगाबाद हा रस्ता बंद करण्यात आला आहे. एसडीआरएफची टीम चाळीसगावला पोहोचली आहे.

कन्नड घाटात दरड कोसळून अनेक वाहने अडकली

जळगावातील चाळीसगाव आणि औरंगाबादला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 211 वर असलेल्या कन्नड घाटावर वाहतूक ठप्प आहे. हा रस्ता पूर्णपणे बंद आहे. डोंगरावरून दरड कोसळल्याने अनेक वाहने चिखलात अडकली आहेत. चाळीसगावहून औरंगाबादला जाण्यासाठी अन्य काही मार्ग वापरण्याची माहिती पोलिसांनी जारी केली आहे. पण जे आले आहेत, त्यांना वाहनांच्या रांगा लागल्याने त्यांना परत जायला जागा मिळत नाही. औरंगाबाद-धुळे महामार्गालगत असलेल्या कन्नड घाटावर हा खडक पडला आहे. स्थानिक प्रशासनाकडून मदतीचे काम सुरू होते. अजूनही घाटावर पाऊस सुरू आहे.

त्याचप्रमाणे राज्यभरात पुढील तीन ते चार दिवस मुंबई, ठाणे, पालघरसह 18 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेषतः पुढील ३-४ तास आणि त्यानंतरही २४ तास हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले आहे.

Maharashtra Heavy Rain in areas like Thane Palghar Jalgaon Chalisgaon and landslide in Aurangabad Kannad Ghat

महत्त्वाच्या बातम्या