वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर रविवारी रात्री ८.४५ वाजता सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणाऱ्या नवीन संसदेच्या इमारतीचे बांधकाम पाहण्यासाठी पोचले. त्यांनी बांधकाम साइटवर सुमारे एक तास घालवला. विशेष म्हणजे मोदी यांनी प्रथमच प्रकल्पाची पाहणी केली. On his return from the US, Prime Minister Modi went straight to see the Vista project; The review took an hour
भारतात पोचल्यावर त्यांनी गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याबरोबर बैठक घेतली.
पंतप्रधानांचे पालम विमानतळावर जोरदार स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रविवारी अमेरिकेच्या तीन दिवसांच्या दौऱ्यानंतर भारतात आगमन झाले. मोदींचे विमान सायंकाळी पालम विमानतळावर उतरले. त्यांचे स्वागत करण्यासाठी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा विमानतळावर उपस्थित होते. भाजपचे सर्व कार्यकर्ते विमानतळाबाहेर नाचत, गात आणि घोषणाबाजी करताना दिसले. मोदींच्या स्वागतासाठी विविध राज्यांतील लोक पारंपारिक कपडे आणि वाद्यांसह येथे दाखल झाले. नड्डा म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या ५ दिवसांच्या अमेरिका दौऱ्यामुळे हे सिद्ध होते की मोदींच्या नेतृत्वाखाली जग भारताला वेगळ्या दृष्टीने पाहते. करोडो भारतीयांच्या वतीने आम्ही त्यांचे स्वागत करतो. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्याशी पंतप्रधान मोदींची मैत्री नवीन नाही, त्यांचे जुने नाते आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी त्याच गोष्टीचा पुनरुच्चार केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App