वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत आहे. डिजिटल बँकिंगचा काळ आला आहे. त्यामुळे अर्थचक्र अधिक सुदृढ ठेवण्यासाठी भारताला स्टेट बँक ऑफ इंडिया सारख्या आणखी ४ ते ५ मोठ्या बँकांची गरज आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. The country needs 4 to 5 big banks like SBI, says Finance Minister Nirmala Sitharaman
भारतीय बँक संघ (आयबीए)च्या ७४ व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीमध्ये त्या बोलत होत्या. सीतारामन म्हणाल्या, भारताला अर्थव्यवस्था आणि उद्योगांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियासारख्या ४ ते ५ बँकांची गरज आहे.
अर्थमंत्री सीतारमण म्हणाल्या अर्थव्यवस्था ताकदीने पुन्हा पुनरुज्जीवनाच्या मार्गावर
त्या म्हणाल्या, भारतीय बँकिंग उद्योगांना इंटर कनेक्टेड डिजिटल सिस्टिमची गरज आहे भविष्यातील आव्हानाचा विचार करता अधिक संख्येमध्ये बँकांची गरज नाही तर मोठ्या बँकांची गरज आहे. भारताला एसबीआय सारख्या किमान चार मोठ्या बँकांची गरज आहे. आम्हाला वाढत्या आणि बदलत्या गारजांची पूर्तता करण्यासाठी बँकिंगला प्रोत्साहन दिले पाहिजे. कोरोनाच्या साथीपूर्वीसुद्धा याबाबत विचार करण्यात आला होता.
त्या म्हणाल्या की, आज डिजिटल पेमेंटच्या जगात भारतीय यूपीआयने खूप मोठा प्रभाव पाडला आहे. आमचे रुपे कार्ड विदेशी कार्डप्रमाणे ग्लॅमरस नव्हते. मात्र आता जगातील अनेक भागात आता ते स्वीकारले जात आहे. हे भारताच्या भविष्यातील डिजिटल पेमेंटमधील दृढ निश्चयाचे उदाहरण आहे.बँकर्सना यूपीआयला महत्त्व देण्याचे आणि त्याला मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App