पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वैयक्तिक संपत्ती ३ कोटी ७ लाख रुपये; प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी साडेसात वर्षांपासून पंतप्रधानपदी आहेत. त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक संपत्तीविषयी अनेकांना उत्सुकता असणारच. त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामधून त्यांची संपत्ती ३ कोटी ७ लाख रुपये एवढी आहे. हिंदुस्तान टाईम्सने यासंदर्भातले वृत्त दिलं आहे.Prime Minister Narendra Modi’s personal property 3 crore 7 lakh Ruppes , The affidavit reveals; increased by 22 lakhs compared to last year

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे ३१ मार्च २०२१ च्या आकडेवारीनुसार ३ कोटी ७ लाखांची संपत्ती आहे. त्यांच्या नावे शेअर्स नाहीत. पण, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (८.९ लाख), विमा पॉलिसी (१.५ लाख) आणि २०१२मध्ये २० हजार रुपयांचे एल अँड टी इन्फ्रास्ट्रक्चर बाँड त्यांच्या नावे आहेत. गांधीनगरच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये१ कोटी ८६ लाख रुपयांची एफडी आहे. गेल्या वर्षी ३१ मार्च रोजी ही एफडी १ कोटी ६ लाख रुपये होती.

पंतप्रधानांच्या नावे गाडी नाही. त्यांच्याकडे ४ सोन्याच्या अंगठ्या आहेत. ज्यांची तेव्हाच्या बाजारभावानुसार किंमत १ लाख ४८ हजार आहे. ३१ मार्च २०२१ रोजीच्या आकड्यांनुसार त्यांच्या बँकेत १ लाख ५० हजार सेव्हिंग आणि ३६ हजाराची रोख रक्कम आहे.



पंतप्रधानपदी आल्यापासून त्यांनी एकही नवी मालमत्ता खरेदी केली नाही. त्यांनी २००२मध्ये खरेदी केलेल्या घराची किंमत १ कोटी १० लाखांच्या आसपास आहे. पण त्यात देखील पंतप्रधानांची संयुक्त मालकी आहे. केवळ २५ टक्के भाग त्यांच्या मालकीचा आहे. या मालमत्तेचं एकूण क्षेत्रफळ १४ हजार १२५ चौरस फूट आहे. त्यात ३ हजार ५३१ चौरस फुटांवर पंतप्रधानांची मालकी आहे.
गेल्या वर्षी ३१ मार्चच्या आकडेवारीनुसार पंतप्रधानांची वैयक्तिक संपत्ती ही २ कोटी ८५ लाख होती. या वर्षी २२ लाखांची भर पडली असून ती ३ कोटी ७ लाखांच्या घरात आहे.

पंतप्रधानांसह मंत्री जाहीर करतात दरवर्षी संपत्ती

अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना केंद्र सरकारने केंद्रातील सर्व मंत्र्यांनी वैयक्तिक संपत्ती दरवर्षी जाहीर करावी, असा निर्णय घेतला होता. कामकाजात पारदर्शकता यावी, यासाठी हा निर्णय घेतला होता. त्यानुसार दरवर्षी ३१ मार्च रोजी मंत्र्यांची संपत्ती जाहीर करणारं प्रतिज्ञापत्र सर्व केंद्रीय मंत्री सादर करतात. यामध्ये पंतप्रधानांच्या प्रतिज्ञापत्राचा देखील समावेश असतो.

Prime Minister Narendra Modi’s personal property 3 crore 7 lakh Ruppes , The affidavit reveals; increased by 22 lakhs compared to last year

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात