चीनच्या वुहानमध्येच कोरोना विषाणूचा जन्म, मानवी हस्तक्षेपाशिवाय तो बनणे अशक्य


वृत्तसंस्था

लंडन : कोरोना विषाणूचे कोणतेही नैसर्गिक गुणधर्म नाहीत. त्यामुळे हा पूर्णत: मानवनिर्मित असल्याचा दावा ब्रिटनमधील शास्त्रज्ञ प्रा. अँगल डल्गलिश आणि नॉर्वेचे शास्त्रज्ञ डॉ बिर्गर यांनी केला आहे. चीनच्या वुहान येथील प्रयोगशाळेतच तो बनविल्याचा दावाही त्यांनी केला आहे. Corona virus made in china only

मानवी हस्तक्षेपाशिवाय हा विषाणू तयार होऊच शकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. याबाबतचा एक सविस्तर अहवाल त्यांनी तयार केला आहे. विषाणूचा घातकपणा वाढविण्यासाठी त्यांनी वटवाघुळांचा वापर केला. कोरोनावरील लस निर्मितीसाठी अभ्यास करत असताना ही बाब स्पष्ट झाल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.



वुहानमधील प्रयोगशाळेतील माहिती जाणीवपूर्वक लपविली गेली आणि नंतर नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच ज्या शास्त्रज्ञांनी यावर आवाज उचलला त्यांना एकतर गप्प केले गेले किंवा त्यांना गायब केले. संशोधनाचे निष्कर्ष प्रकाशित करायचे तेव्हा अनेक वैज्ञानिक जर्नलनी नकार दिला. त्यामुळे चीनचे पितळ उघडे पडले नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

Corona virus made in china only

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात