चायना व्हायरस म्हटल्याबद्दल डोनाल्ड ट्रंप यांच्याविरुध्द खटला दाखल


चीननेच कोरोना व्हायरस संपूर्ण जगात पसरविला याबद्दल खात्री असल्याने अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड चायना व्हायरस याचा उल्लेख करत होते. मात्र, आता यावरून चायनीज-अमेरिकन सिव्हील राईटस ग्रुपने त्यांच्यावर खटला दाखल केला आहे. Filed a lawsuit against Donald Trump for calling it a China virus


विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन : चीननेच कोरोना व्हायरस संपूर्ण जगात पसरविला याबद्दल खात्री असल्याने अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड चायना व्हायरस याचा उल्लेख करत होते. मात्र, आता यावरून चायनीज-अमेरिकन सिव्हील राईटस ग्रुपने त्यांच्यावर खटला दाखल केला आहे.

न्यूयॉर्कमधील फेडरल कोर्टात खटला दाखल करण्यात आला. डोनाल्ड ट्रंप यांनी चायनीज व्हायरस आणि त्यासारखीच अनेक वंशद्वेषी वक्तव्ये केली आहेत. कोरोना व्हायरसचा उगम चीनमधून झाला आहे याबाबत आत्तापर्यंत कोणताही ठोस पुरावा मिळलेला नाही. परंतु, डोनाल्ड ट्रंप यांनी संपूर्ण समाजाला बदनाम केले आहे. डोनाल्ड ट्रंप यांनी संपूर्ण महामारीच्या काळात बेताल आणि बेजबाबदार वक्तव्ये केली. चीनी व्हायरसारख्या त्यांच्या वक्तव्यामुळे अमेरिकेतील चीनी समुदायाला भावनिक धक्का बसला आहे.कोरोनाच्या महामारीच्या काळात अशियन अमेरिकनांविरुध्द हिंसाचारही झाला. त्यामध्ये प्रामुख्याने चीनी समुदायाला लक्ष्य करण्यात आले. त्यामागे डोनाल्ड ट्रंप यांची बेजबाबदार वक्तव्येच होती. यामधील एक भीषण प्रकार अटलांटा येथील एका मसाज पार्लरमध्ये घडला होता. १७ मार्च रोजी एका बंदुकधाऱ्या ने सहा महिलांसह आठ जणांना ठार मारले होते. सर्व जण अशियन होते.

Filed a lawsuit against Donald Trump for calling it a China virus

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था