देशात कोरोना नियंत्रणात, ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नाही ; केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशात कोरोना नियंत्रणात असून ओमायक्रॉनचा एकही रुग्ण आढळलेला नाही, असे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी मंगळवारी स्पष्ट केले.Corona under control in the country, there is not a single patient of Omycron: Union Health Minister Mansukh Mandavia

जगभरातील अनेक देशात कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूने डोके वर काढले आहे. विशेषतः दक्षिण आफ्रिकेत. परंतु, भारतात त्याची एकलाही लगण झाली नसल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी संसदेत स्पष्ट केले. त्यामुळे दिलासा मिळाला आहे.



कोरोनापेक्षा हा ओमायक्रॉन अधिक धोकादायक आहे. त्यामुळे सरकारने आतापासूनच खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. ओमायक्रॉन विषाणू प्रतिबंधासाठी केंद्र सरकारकडून कठोर पावले उचलण्यात आल्याचेही मंडाविया यांनी स्पष्ट केले.

राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात आरोग्यमंत्री म्हणाले,. ‘‘सध्या १४ देशांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. मात्र भारतात एकही रुग्ण आढळला नाही. देशातील सर्व विमानतळांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. संशयित रुग्णांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात येत आहेत,’’ असे मंडाविया यांनी सांगितले.

Corona under control in the country, there is not a single patient of Omycron: Union Health Minister Mansukh Mandavia

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात