‘काँग्रेसने लोकशाही मूल्यांना चिरडले’, आणीबाणीत काय-काय होते बॅन? पीएम मोदींनी शेअर केली तथ्ये

Congress crushed our democratic values, what were the restrictions in emergency? Facts shared by PM Modi

Restrictions In Emergency : बरोब्बर 46 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी देशात आणीबाणी लागू झाली होती. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर जोरदार हल्ला चढविला असून ते म्हणाले की, कॉंग्रेसच्या तत्कालीन इंदिरा गांधी सरकारने आमच्या लोकशाही मूल्यांनाच चिरडले नाही, तर महापुरुषांचा ऐतिहासिक वारसादेखील अंधकारात ढकलला होता. आणीबाणीच्या स्मृतिदिनानिमित्त पंतप्रधानांनी आणीबाणीला विरोध दर्शविणार्‍या आणि लोकशाहीचे रक्षण करणाऱ्या महापुरुषांच्या आठवणी जागवल्या. Congress crushed our democratic values, what were the restrictions in emergency? Facts shared by PM Modi


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : बरोब्बर 46 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी देशात आणीबाणी लागू झाली होती. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर जोरदार हल्ला चढविला असून ते म्हणाले की, कॉंग्रेसच्या तत्कालीन इंदिरा गांधी सरकारने आमच्या लोकशाही मूल्यांनाच चिरडले नाही, तर महापुरुषांचा ऐतिहासिक वारसादेखील अंधकारात ढकलला होता. आणीबाणीच्या स्मृतिदिनानिमित्त पंतप्रधानांनी आणीबाणीला विरोध दर्शविणार्‍या आणि लोकशाहीचे रक्षण करणाऱ्या महापुरुषांच्या आठवणी जागवल्या.

पंतप्रधान मोदींनी ट्वीट केले की, “अशाप्रकारे कॉंग्रेसने आपल्या लोकशाही मूल्यांना चिरडले. आणीबाणीला विरोध दर्शविणार्‍या आणि भारतीय लोकशाहीचे रक्षण करणाऱ्या सर्व महापुरुषांना आम्ही आठवतो.”

पंतप्रधानांनी दुसर्‍या ट्वीटमध्ये लिहिले, “#DarkDaysOfEmergency कधीही विसरू शकत नाही. 1975 ते 1977 या कालावधीत संस्थांचा पद्धतशीर विनाश झालेला पाहिला. चला आपण भारताच्या लोकशाही भावनेला बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा संकल्प घेऊया आणि आपल्या संविधानातील निहित मूल्यांवर खरे उतरू.”

यासह पीएम मोदी यांनी इन्स्टाग्रामवर भाजपने शेअर केलेली तथ्यांची स्लाइडही शेअर केली आहे, जी आणीबाणीशी संबंधित आहे. आणीबाणीशी संबंधित असलेल्या या स्लाइडमध्ये कॉंग्रेसच्या तत्कालीन सरकारने बंदी घातलेल्या गोष्टी दर्शवण्यात आल्या आहेत.

1975 ते 1977 दरम्यान म्हणजेच आणीबाणीच्या वेळी स्वातंत्र्यसैनिक आणि शहीद देशभक्त चंद्रशेखर आझाद आणि भगतसिंग यांच्यावरील चित्रपटांवर बंदी घालण्यात आली होती. याखेरीज किशोर कुमार यांची गाणी, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या विचारांचा प्रसार करण्यासही बंदी होती.

25 जून 1975 ते 21 मार्च 1977 या काळात 21 महिन्यांच्या कालावधीसाठी देशात आणीबाणी लागू झाली. त्यावेळी इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या.

Congress crushed our democratic values, what were the restrictions in emergency? Facts shared by PM Modi

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात