Enforcement Directorate Conducting Raids At Former Maharashtra Home Minister AnilDeshmukh Nagpur Residence

अंमलबजावणी संचालनालयाचा माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या निवासस्थानी छापा, मनी लॉन्ड्रिंगचा आरोप

Enforcement Directorate :  माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने शुक्रवारी छापा टाकला. ईडीने अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी छापा टाकला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, यावरून ईडी त्यांची सातत्याने चौकशी करत आहे. Enforcement Directorate Conducting Raids At Former Maharashtra Home Minister AnilDeshmukh Nagpur Residence


विशेष प्रतिनिधी

नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने शुक्रवारी छापा टाकला. ईडीने अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी छापा टाकला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, यावरून ईडी त्यांची सातत्याने चौकशी करत आहे.

परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराबाबत गंभीर आरोप केले होते. त्याशिवाय परमबीर सिंग यांनीही मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, त्यात असे सांगितले गेले होते की, अनिल देशमुख यांनी सचिन वाजे यांना दरमहा सुमारे 100 कोटी रुपये खंडणी गोळा करण्यास सांगितले होते.

मनी लाँड्रिंगच्या गंभीर आरोपावरून अंमलबजावणी संचालनालयाने अनिल देशमुख यांच्या घरी दुसऱ्यांदा छापा टाकला आहे. यापूर्वी 25 मे रोजी त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला होता. अंमलबजावणी संचालनालयापूर्वी सीबीआयनेही त्यांच्या घरी छापा टाकला होता. अनिल देशमुख यांच्यावरील आरोपानंतर त्यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

परमबीर सिंगशिवाय सचिन वाजे यांनीही अनिल देशमुख यांच्यावर बेकायदा खंडणीचा आरोप केला. सचिन वाजे यांनी एएनआयला दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, मी 6 जून 2020 रोजी पुन्हा कर्तव्यावर दाखल झालो होतो. तथापि, मी रुजू होण्यावर शरद पवार खुश नव्हते आणि त्यांनी मला पुन्हा निलंबित करण्यास सांगितले. हे मला स्वत: अनिल देशमुख यांनी सांगितले होते. पवारांना पटवण्यासाठी अनिल देशमुख यांनी मला दोन कोटी रुपयांची मागणी केली होती. एवढी मोठी रक्कम देणे मला शक्य नव्हते, अनिल देशमुख यांनी नंतर मला ते देण्यास सांगितले. यानंतर माझे पोस्टिंग मुंबईच्या क्राइम इंटेलिजेंस युनिटमध्ये झाले.

Enforcement Directorate Conducting Raids At Former Maharashtra Home Minister AnilDeshmukh Nagpur Residence

महत्त्वाच्या बातम्या