Elderline Project : काय आहे योगी सरकारचा ‘एल्डरलाइन प्रोजेक्ट’? मिळतोय उदंड प्रतिसाद, पंतप्रधान मोदींनीही केले कौतुक

CM Yogi Elderline Project Gets Overwhelming Response, PM Modi Also praises project

Elderline Project : पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री योगींच्या योजनेचे कौतुक केले आहे. योगी सरकारची ही योजना काय आहे आणि त्यामध्ये कोणाला फायदा होत आहे, ज्याचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले आहे, हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. योगी सरकारच्या ‘एल्डरलाइन प्रोजेक्ट’बद्दलची माहिती येथे देत आहोत. CM Yogi Elderline Project Gets Overwhelming Response, PM Modi Also praises project


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : अलीकडेच केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारमधील मतभेदांच्या बातम्या चर्चेत राहिल्या. परंतु पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यात झालेल्या बैठकीत मतभेद झाल्याचे वृत्त निराधार असल्याचे सिद्ध झाले. आता पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री योगींच्या योजनेचे कौतुक केले आहे. योगी सरकारची ही योजना काय आहे आणि त्यामध्ये कोणाला फायदा होत आहे, ज्याचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले आहे, हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. योगी सरकारच्या ‘एल्डरलाइन प्रोजेक्ट’बद्दलची माहिती येथे देत आहोत.

वृद्धांची सेवा करण्यासाठी आणि त्यांच्या मानसिक आणि शारीरिक समस्या कमी करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने ‘एल्डरलाइन प्रकल्प’ सुरू केला आहे. राज्यातील सर्व 75 जिल्ह्यांत निराधार वृद्ध नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी आणि त्यांना आजारापासून वाचवण्यासाठी 14 मे 2020 पासून यांची सुरुवात झाली आहे.

हेल्पलाइन नंबर जारी

एल्डरलाइन प्रकल्पांतर्गत टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक 14567 देण्यात आला आहे. ही हेल्पलाइन सुविधा सर्व नागरिकांना सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत उपलब्ध आहे. या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून राज्यातील ज्येष्ठ नागरिक आपल्या समस्या सांगतात. त्यानुसार, यूपी सरकार वृद्धांना मदत करते. या एल्डरलाइनच्या संचालनाची जबाबदारी यूपीकॉनला देण्यात आली आहे.

असे करणारे उत्तर प्रदेश हे पहिले राज्य

कोरोना कालावधीत 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठांचे आरोग्य लक्षात घेऊन योगी सरकारने हा प्रकल्प सुरू केला आहे. टाटा ट्रस्ट आणि एनएसई फाउंडेशनच्या मदतीने हा प्रकल्प राबवला जात आहे. उत्तर प्रदेश हे कोरोना साथीच्या काळात वृद्धांना भावनिक, आरोग्य आणि कायदेशीर मदत देणारे देशातील पहिले राज्य बनले आहे. या सेवेसाठी यूपीकॉनने 75 जिल्ह्यांत 35 प्रतिसाद अधिकारी तैनात केले आहेत.

दररोज 80 ते 90 कॉल

मीडिया रिपोर्टनुसार, प्रोजेक्ट एल्डरलाइनची अंमलबजावणी झाल्यापासून दररोज सुमारे 80 ते 90 कॉल येतात. या माध्यमातून यूपी सरकार वृद्धांना मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगी आदित्यनाथ सरकारच्या ‘एल्डरलाइन’च्या योजनेचे कौतुक केले. पीएम मोदी यांनी ट्वीट करून म्हटले की, हा खूप चांगला उपक्रम आहे.

CM Yogi Elderline Project Gets Overwhelming Response, PM Modi Also praises project

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात