राजकीय नावांची विचित्र क्रेझ; तामिळनाडूत लागले सोशलिझम – ममता बॅनर्जींचे लग्न


वृत्तसंस्था

सालेम : चलतीच्या राजकारणाचा कोण, कधी, कुठे, कसा फायदा करून घेईल काही सांगता येत नाही. पश्चिम बंगालच्या निवडणूकीनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या नावाची देशाच्या राजकारणात चलती सुरू झाली आणि त्यांचे नाव वापरण्यास सुरूवात झाली. The wedding of a couple named Socialism & Mamata Banerjee took place in Salem district yesterday



असाच एक प्रकार तामिळनाडूच्या सालेम जिल्ह्यातून समोर आला आहे. तिथे ममता बॅनर्जी नावाच्या मुलीचे सोशलिमझम नावाच्या मुलाशी लग्न लावण्यात आले आहे. लग्न खरे आहे आणि माणसेही खरी आहेत. सोशलिझम हे मार्क्सवादी कम्यिनिस्ट पक्षाचे सालेममधले नेते ए. मोहन यांच्या मुलाचे नाव आहे, तर ममता बॅनर्जी हे मुलीचे नाव आहे. तिचे मूळ नाव देखील वेगळे आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तामिळनाडूतले नेते आर. मुथारासन हे या लग्नाला उपस्थित होते.

नावांची ही विचित्र क्रेझ सोशलिझम किंवा ममता बॅनर्जी या नावांपुरतीच मर्यादित नाही. नरेंद्र मोदी जेव्हा पहिल्यांदा पूर्ण बहुमत मिळवून पंतप्रधान बनले तेव्हा उत्तर प्रदेशातील एका मुस्लीम महिलेने तिच्या मुलाचे नाव नरेंद्र मोदी ठेवले होते. पण नंतर तिच्या कुटुंबातून दबाव आल्यामुळे तिला ते नाव बदलून मुलाचे नाव मुसलमानाला साजेसे ठेवावे लागले होते.

तसेच तामिळनाडूचे सध्याचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचेही नाव त्यांचे पिता एम. करूणानिधी यांनी रशियाचे सर्वोच्च नेते स्टॅलिन यांच्या नावाच्या क्रेझमधूनच ठेवले होते. तेच नाव पुढे रूढ झाले आहे.

The wedding of a couple named Socialism & Mamata Banerjee took place in Salem district yesterday

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात