अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांचा चीनविरोधात आव आक्रमक; भाषा गुळमुळीत!!


वृत्तसंस्था

लंडन – जी – ७ आणि मित्र – ४ देशांच्या बैठकीत कोरोना फैलावासाठी चीनला कोणीही थेट दोषी मानले नाही. पण मानवाधिकाराच्या मुद्द्यावरून त्या देशाच्या कम्युनिस्ट राजवटीवर टीका केली असली, तरी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आक्रमक आव आणून गुळमुळीत भाषा वापरली आहे. Xi Jinping myself, we’re not looking for conflict. Where we cooperate, we’ll cooperate

जी – ७ देशांच्या बैठकीनंतर ज्यो बायडेन म्हणाले, की मी चीनचे अध्यक्ष क्षी जिंगपिंग यांना सरळ सांगितले, आम्हाला चीनशी संघर्ष नकोय. पण ज्या मुद्द्यांवर आपले मतभेद आहेत, ते मी आपल्याला सरळसोट शब्दांत सांगेन. जिथे सहकार्य करायचे तिथे सहकार्य करू. पण जिथे आपले मतभेद आहेत तिथे मी सरळ शब्दांमध्ये आपल्याला सांगेन.



कोरोनाचा फैलाव चीनमधून झाला. पण त्याबद्दल बायडेन यांनी काहीही म्हटले नाही. जी – ७ आणि मित्र – ४ देशांच्या बैठकीतील ठरावाचाच त्यांनी पुनरूच्चार केला. ते म्हणाले, की चीनने हाँगकाँग आणि झिजियांग प्रांतांमधील नागरिकांच्या मानवाधिकाराचे हनन थांबवावे. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांचा हक्क मान्य करावा. चीनच्या व्यापार धोरणात स्पर्धेला स्थानच नाही. सौरऊर्जेवर आधारित शेती आणि तयार कपड्यांच्या उद्योगात चीनमध्ये अजूनही कामाची सक्ती केली जाते. ही वेठबिगारी आहे. ती बंद केली पाहिजे.

मानवाधिकार हननाखेरीज चीनच्या अन्य धोरणांबाबत जी – ७ आणि मित्र – ४ देशांनी एकत्र येऊन भाष्य करण्याचे टाळले. त्याच वेळी ज्यो बायडेन यांनी देखील आक्रमक आव आणून भाषा गुळमुळीतच वापरल्याचे स्पष्ट झाले.

Xi Jinping myself, we’re not looking for conflict. Where we cooperate, we’ll cooperate

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात