नेपाळमध्ये कोरोनाने हाहाकार, ७७ पैकी ७५ जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाउन


वृत्तसंस्था

काठमांडू : कोरोनाने नेपाळमध्ये हाहा:कार माजविला असून काही दिवसांपूर्वी ४० टक्क्यांपेक्षा अधिक पॉझिटिव्हीटी रेट असल्याने ७७ पैकी ७५ जिल्ह्यात संपूर्णपणे लॉकडाउन लागू करण्यात आले. राजधानी काठमांडू येथे ४५ दिवसांच्या कडक लॉकडाउननंतर काही प्रमाणात रुग्णसंख्या कमी झाली आहे. परंतु आता ग्रामीण भागात संसर्ग पसरत असल्याचे दिसून येत आहे. Nepal struggling for corona battle

पावणे तीन कोटींची लोकसंख्या असलेल्या लहान देशात ६ लाखांहून अधिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी निम्मे रुग्ण राजधानीतील आहेत. चाचणीचे प्रमाण कमी असतानाही रुग्णांची संख्या मात्र वाढली आहे. नेपाळमध्ये आतापर्यंत ८२३८ जणांचा मृत्यू झाला आहे.



नेपाळमध्ये बहुतांश भागातील पॉझिटिव्हीटी रेट २० टक्कयांपेक्षा अधिक आहे तर राष्ट्रीय सरासरी २८ टक्के आहे. तीन आठवड्यापूर्वी नेपाळमध्ये सरासरी पॉझिटिव्हीटी रेट हा ४४.६७ टक्के होता आणि तो जगात सर्वाधिक होता. त्यामुळे कोविडचा मुकाबला करण्यासाठी देशात कडक लॉकडाउन लागू करण्यात आला आणि परिणामी रुग्णसंख्येत घट झाली.

नेपाळमध्ये आतापर्यंत ७ लाखांपेक्षा कमी लोकांना दोन डोस मिळाले तर २१ लाख लोकांना पहिला डोस मिळाला आहे. लस उपलब्ध नसल्याने देशात २८ एप्रिलला लसीकरण थांबवण्यात आले. एक मे नंतर दुसरा डोस दिला गेला. आता चीनमधून लस आल्यानंतर ८ जूनपासून पुन्हा लसीकरण सुरू झाले आहे.

Nepal struggling for corona battle

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात