चक्रीवादळांचा अंदाज लवकर वर्तविता येणार, आयआयटीच्या  संशोधकांकडून नवीन पद्धत विकसित


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आयआयटी खरगपूरमधील संशोधकांनी चक्रीवादळांचा लवकर अंदाज वर्तविणारी नवीन पद्धत विकसित केली आहे. हवामान बदल उपक्रमातंर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचेही सहकार्य यासाठी लाभले. IIT develop new system for cyclone prdiction

संशोधकांनी मॉन्सूनपूर्वी तयार झालेल्या दोन आणि मॉन्सूननंतर निर्माण झालेल्या चार तीव्र चक्रीवादळांचा अभ्यास केला. सध्या समुद्राच्या पृष्ठभागावरील बदल उपग्रहामार्फत टिपून चक्रीवादळांचा अंदाज बांधला जातो. उपग्रह त्यानंतर चक्रीवादळाच्या प्रगतीवरही लक्ष ठेवतात. मात्र, या नवीन पद्धतीतून चक्रीवादळापूर्वी अगदी सुरुवातीला वातावरणीय स्तंभात निर्माण होणारे चक्रवात व हवामानातील बदल ओळखता येतात. त्यातून मॉन्सूनपूर्व व मॉन्सूनोत्तर काळात चक्रीवादळ तयार होण्यापूर्वी किमान चार दिवस अंदाज वर्तविता येईल, असे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटले आहे.आतापर्यंत, रिमोट सेन्सिंगद्वारे चक्रीवादळांबद्दल लवकरात लवकर अंदाज बांधला जात होता. त्यात, समुद्राच्या गरम पाण्याच्या पृष्ठभागावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानंतरच चक्रीवादळाबद्दल असा अंदाज व्यक्त करता येता होता. नवीन पद्धतीमुळे ही दरी भरून काढता येणार आहे. समुद्रात चक्रीवादळाच्या अशा प्रकारे लवकर अंदाज वर्तविल्यामुळे प्रत्यक्ष चक्रीवादळ धडकण्यापूर्वी पूर्वतयारीसाठी बराच वेळ मिळू शकतो. त्यामुळे, चक्रीवादळांमुळे होणारी सामाजिक – आर्थिक हानीही रोखता येऊ शकेल, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले.

IIT develop new system for cyclone prdiction

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती