छत्तीसगडच्या रायपूर रेल्वे स्टेशनमध्ये स्फोट, सीआरपीएफचे 6 जवान जखमी


रायपूर रेल्वे स्थानकावर सकाळी 6.30 च्या सुमारास स्फोट झाला. मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटात सीआरपीएफचे 6 जवान जखमी झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट डिटोनेटर स्फोटामुळे झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डिटोनेटर एका बोगीतून दुसऱ्या बोगीत नेले जात होते. यादरम्यान अपघात झाला. Chhattisgarh raipur railway station blast 6 crpf personnel injured


वृत्तसंस्था

रायपूर : रायपूर रेल्वे स्थानकावर सकाळी 6.30 च्या सुमारास स्फोट झाला. मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटात सीआरपीएफचे 6 जवान जखमी झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट डिटोनेटर स्फोटामुळे झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डिटोनेटर एका बोगीतून दुसऱ्या बोगीत नेले जात होते. यादरम्यान अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, प्लॅटफॉर्म क्रमांक 2 मध्ये दोन बोगी हलवताना हा अपघात झाला. जखमी जवानांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचवेळी, सीआरपीएफचे एक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि घटनास्थळाची पाहणी केली.

इग्नायटर सेट पडल्यामुळे अपघात

एएनआय या वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी सांगितले की, शनिवारी रायपूर रेल्वे स्टेशनवर सीआरपीएफच्या विशेष ट्रेनमध्ये इग्नायटर सेट असलेला बॉक्स जमिनीवर पडल्यानंतर स्फोट झाला. एजन्सीच्या मते, ही घटना सकाळी 6.30 वाजता घडली. झारसुगुडा ते जम्मू तवी ट्रेन फलाटावर उभी होती. एक सीआरपीएफ जवान, हेड कॉन्स्टेबल यांना रायपूरच्या नारायण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

पोलीस घटनास्थळी पोहोचले

या ट्रेनमध्ये सीआरपीएफच्या तीन कंपन्या पाठवण्यात येत होत्या. जेव्हा ट्रेनमध्ये सामान ठेवले जात होते, तेव्हा बोगी क्रमांक नऊजवळ एक कंटेनर (ज्यामध्ये स्फोटके ठेवलेली होती) फुटली. या घटनेत हवालदार चौहान विकास लक्ष्मणसह चार सैनिक जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले.

Chhattisgarh raipur railway station blast 6 crpf personnel injured

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात