मशीदीसमोर प्रचार केल्याच्या आरोपावरून भाजपाच्या तमीळनाडूतील थाउजंट लाईटस मतदारसंघातील उमेदवार अभिनेत्री खुशबू यांच्याविरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची तक्रार भरारी पथकातील अधिकाऱ्याने दिल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे. BJP candidate Khushboo charged with campaigning in front of a mosque
विशेष प्रतिनिधी
चेन्नई : मशीदीसमोर प्रचार केल्याच्या आरोपावरून भाजपाच्या तमीळनाडूतील थाउजंट लाईटस मतदारसंघातील उमेदवार अभिनेत्री खुशबू यांच्याविरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची तक्रार भरारी पथकातील अधिकाऱ्याने दिल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे.
फियार्दीत म्हटले आहे की खुशबू आणि त्यांचे समर्थक एका मशिदीसमोर उभे राहून आवश्यक परवानगी न घेता पत्रके वाटताना दिसले. त्यांच्या कृत्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन होत आहे. तक्रार मिळताच कोडमबक्कम पोलिसांनी खुशबू यांच्यावर गुन्हा दाखल केला.
काँग्रेसला सोडचिठ्ठी देत अभिनेत्री खुशबू भाजपात
प्रसिध्द अभिनेत्री खुशबू यांनी द्रवीड मुनेत्र कळघमच्या (द्रुमुक) प्रवक्त्या होत्या. २०१४ मध्ये त्यांनी कॉँग्रेमध्ये प्रचार केला होता. नुकताच त्यांनी कॉँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. मध्य चेन्नई लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या थाऊजंट लाईटस या मतदारसंघातून त्यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. त्यांनी प्रचारात अनेक अभिनव तंत्रे वापरली आहेत. चेन्नईतील एका रस्त्यावर त्यांनी डोसे बनवून मतदारांना खाऊ घातले होते. त्याची चांगलीच चर्चा झाली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App