बाबरी मशीद नहीं भुलेंगे; PFI च्या साहित्यातून धक्कादायक माहिती उघड


वृत्तसंस्था

मुंबई : PFI ने औरंगाबादला धर्मांधतेचे हब आणि भारताला इस्लामिक राष्ट्र करण्याचा कट रचला होता. यासाठी पीएफआयने आपल्या सदस्यांचे विद्रोही पुस्तकाच्या माध्यमातून ब्रेन वाॅश केले होते, तर एटीएसने अटक केलेल्या पीएफआयच्या कार्यकर्त्यांकडून बाबरी मशीद नही भुलेंगे लिहिलेले साहित्य सापडले आहे. अटकेतील पीएफआय कार्यकर्त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडीची मुदत वाढवून दिली आहे. Babri Masjid Nahin Bhulenge; Shocking information revealed from PFI literature

औरंगाबादला बनवायचे होते धर्मांधतेचे हब 

औरंगाबाद येथून ताब्यात घेण्यात आलेल्या पीएफआय कार्यकर्त्यांमध्ये इरफान मल्ली हा संघटनेच्या राज्य कमिटीचा सदस्य म्हणून काम करत होता. एटीएसने त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या घरात एक तलवार सापडली आहे. त्याने अशी शस्त्रे अनेकांना वाटल्याचा संशय एटीएसला आहे. सोबतच त्याच्याकडे पीएफआयचे पब्लिकेशन सापडले असून, ज्यात बाबरी मशीद नही भुलेंगे लिहिलेले साहित्य सापडले आहे. विशेष म्हणजे इरफान एक खासगी मदरसा चालवत होता आणि तिथेच तो जिहादी शिक्षण देत असल्याचा एटीएसला संशय आहे. त्यामुळे त्याच्याकडे कुणी शिक्षण घेतले त्यांची पार्श्वभूमीसुद्धा एटीएस तपासत आहे.

पाचही आरोपींविरोधात देशविघातक कृत्यांचे पुरावे

औरंगाबाद येथून ताब्यात घेण्यात आलेल्या शेख इरफान मल्ली, सय्यद फैजल, परवेज खान, अब्दुल हबीब, नासेर शेख यांच्याविरोधात देशविघातक कृत्यांच्या नियोजनाच्यादृष्टीने सबळ पुरावे असल्याची माहिती एटीएसने न्यायालयात दिली आहे.

Babri Masjid Nahin Bhulenge; Shocking information revealed from PFI literature

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात