इतिहासात पहिल्यांदाच संघाच्या नेतृत्व फळीत महिला : 2025 पर्यंत महिला असतील सहकार्यवाह आणि सहसरकार्यवाह


 

प्रतिनिधी

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघात लवकरच सहकार्यवाह (सरचिटणीस) आणि सहसरकार्यवाह (सचिव) या पदांची जबाबदारी महिलांना मिळू शकते. संघ स्थापनेच्या शताब्दीपर्यंत (2025) राष्ट्रसेविका समितीत सहभागी महिलांना संघात आणले जाऊ शकते. संघाच्या 97 वर्षांच्या इतिहासात कोणत्याही महिलेला ही पदे मिळाली नव्हती. For the first time in history, women in the leadership ranks of the Sangh By 2025, women will be co-workers and co-workers

सूत्रांनुसार, महिलांना प्रमुख पदांवर नियुक्त करण्यावर संघात सहमती झाली आहे. त्यामुळे प्रथमच नागपूरमध्ये संघाच्या दसरा कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून गिर्यारोहक संतोष यादव यांना आमंत्रित केले आहे. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून संतोष यादव या पहिल्या महिला असतील.



संघटनेत सर्वोच्च पदांवर महिला का नाहीत, असा प्रश्न संघाला अनेकदा विचारण्यात आला आहे. त्यामुळे सहकार्यवाह आणि सहसरकार्यवाह या पदांची जबाबदारी महिलांना दिली जावी यावर संघात सहमती झाली आहे. भविष्यात राष्ट्रसेविका समितीशी संबंधित महिलांना संघात येण्याची संधी मिळेल.

दोन घटना ज्या कायम स्मृतीत राहतील…

1) लक्ष्मीबाई केळकर : 1936 मध्ये विजयादशमीला राष्ट्रसेविका समितीची स्थापना केली. नाव कमल, पण मावशी म्हणत असत.

2) संतोष यादव : जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट दोनदा सर करणाऱ्या जगातील पहिल्या महिला. या विजयादशमीस संघ कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या.

1936 पासून संघात महिलांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या

संघाचे एक ज्येष्ठ पदाधिकारी म्हणाले की, संघ देशाच्या अर्ध्या लोकसंख्येपासून दूर आहे, असा आरोप अनेक वर्षांपासून होत आला आहे. पण तसे नाही. संघाच्या स्थापनेच्या ११ वर्षांनंतर १९३६ पासून संघात महिला महत्त्वाच्या भूमिका पार पाडत आहेत. महिलांसाठी बाल शाखा, तरुण शाखा आणि राष्ट्रसेविका समिती आहे. देशभरात राष्ट्रसेविका समितीच्या ३,५०० पेक्षा जास्त शाखा आहेत. सध्या शांताक्का या समितीच्या प्रमुख आहेत.

सुषमा स्वराज, सुमित्रा महाजन

राष्ट्रसेविका समितीतील महिला भाजपत प्रमुख पदांवर पोहोचल्या आहेत. सुषमा स्वराज आणि सुमित्रा महाजन यांच्यासारख्या महिला समितीत होत्या आणि सरकारमध्ये उच्च पदांवर पोहोचल्या.

सरसंघचालकांनी व्यक्त केला विचार

गेल्या वर्षी दिल्लीत विदेशी प्रतिनिधींशी चर्चेदरम्यान सरसंघचालक भागवत यांना याबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. त्यानंतरच महिलांना जबाबदारी देण्याबाबत गांभीर्याने मंथन सुरू झाले. यंदा जेव्हा संतोष यादव यांना प्रमुख पाहुण्या म्हणून निमंत्रित करण्यासाठी संघाचे लोक गेले तेव्हा तेथेही महिलांबाबतच्या संघाच्या दृष्टिकोनावर चर्चा झाली होती.

संघाच्या विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी घरातील पुरुषांशीच चर्चा होते. आता महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांची बरोबरी करत आहेत. त्यामुळे जर पुरुष पदाधिकाऱ्यांच्या समकक्ष महिला पदाधिकाऱ्यांनीही संघाची जबाबदारी घेतली तर हे चांगले पाऊल असेल.

For the first time in history, women in the leadership ranks of the Sangh By 2025, women will be co-workers and co-workers

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात