अमेरिकेचे सैन्य परतू लागले माघारी, अफगाणमधील बळींच्या संख्येत प्रचंड वाढ


विशेष प्रतिनिधी

काबूल : अमेरिकेच्या सैन्यमाघारीच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानमधील हिंसाचाराचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. अफगाणिस्तान सरकारबरोबर शांतता चर्चा सुरु असल्याने तालिबानने हिंसाचार थांबवावा, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांनी केले आहे. As US troops begin to retreat, the number of casualties in Afghanistan rises sharply

संयुक्त राष्ट्रांनी २००९ पासून येथील स्थितीचा सविस्तर आढावा आणि नोंदी ठेवण्यास सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानातील निम्मे जिल्हे तालिबानने ताब्यात घेतले आहेत.



यातील अनेक जिल्हे विनासायास दहशतवाद्यांच्या हाती पडले असून या जिल्ह्यांमधील सैनिक आणि पोलिस पळून गेले आहेत. त्यामुळे जानेवारी ते जून या कालावधीत संघर्षात सामान्य नागरिकांचा मृत्यू होण्याचे प्रमाण ४७ टक्क्यांनी वाढले आहे.

गेल्या बारा वर्षांमध्ये, दरवर्षी जानेवारी ते जून या कालावधीत महिला आणि लहान मुले मृत्युमुखी किंवा जखमी होतात, त्या तुलनेत यंदाची संख्या अधिक आहे. या वर्षी पहिल्या सहा महिन्यांत १६५९ सामान्य नागरिकांचा हिंसाचारात मृत्यू झाला.

As US troops begin to retreat, the number of casualties in Afghanistan rises sharply

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात