गलती उन्हींसे होती है जो काम करते है…निकम्मोंको तो, अनुपम खेर यांनी टीकाकारांना दिले उत्तर


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नेहमीच पाठराखण करणारे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी एका कार्यक्रमात त्यांच्यावर कथित टीका केल्याने अनेकांच्या मनात उकळ्या फुटल्या होत्या. परंतु, गलती उन्हीसे होती है जो काम करते है…निकम्मोंको तो, असे म्हणत खेर यांनी टीकाकारांना उत्तर दिले आहे. Anupam Kher answered the critics


 

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नेहमीच पाठराखण करणारे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी एका कार्यक्रमात त्यांच्यावर कथित टीका केल्याने अनेकांच्या मनात उकळ्या फुटल्या होत्या. परंतु, गलती उन्हीसे होती है जो काम करते है…निकम्मोंको तो, असे म्हणत खेर यांनी टीकाकारांना उत्तर दिले आहे.

अनुपम खेर हे केंद्र सरकारचे कायम कौतुक करत असतात. पण त्यांनी दोन दिवसांपूर्वी करोना व्यवस्थापनाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर बोचरी टीका केली होती. त्यामुळे अनेकांचे अनुपम खेर यांच्यावरील प्रेम उफाळून आले होते. त्यांच्या या मुलाखतीचा व्हिडीओही शेअर केला जात होता. बघा, आता अनुपम खेर यांनीही केंद्र सरकारवर टीका केली असे म्हटले जात होते. परंतु, अनुपम खेर यांनी ट्विट करून या सगळ्यांना उत्तर दिले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, जे काम करतात त्यांच्याकडूनच चुका होतात, पण काम न करणाºयांचे आयुष्य दुसºयाचे वाईट शोधण्यात संपते.



अनुपम खेर हे नेहमी पंतप्रधानांचे कौतुक करताना दिसून येतात किंवा केंद्र सरकारची बाजू भक्कमपणे मांडत बचाव करत असतात. पण बुधवारी त्यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केंद्र सरकारवर टीका केली. करोना संकटा योग्य व्यवस्थापन करण्यात सरकार अपयशी ठरलं आहे. ही वेळ आपली प्रतिमा बनवण्याची नाही तर नागरिकांचे जीव वाचवण्याची आहे. प्रतिमा बनवण्याशिवाय जीवनात इतरही कामं आहेत, असं अनुपम खेर म्हणाले होते.

Anupam Kher answered the critics

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात