भारताविरुध्द आणखी एक आंतराराष्ट्रीय कट, कोव्हॅक्सिन लस घेतलेल्यांना ट्रॅव्हल पॉलीसअंतर्गत मिळणार नाही परदेशात प्रवेश


भारताने विकसित केलेल्या कोव्हॅक्सिन लसीवर संशय घेणे आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरूच आहे. त्यामुळे अनेक देशांनी आपल्या ट्रॅव्हल पॉलीसीमध्ये ‘भारत बायोटेक’ निर्मित ‘कोवॅक्सिन’ या लसीचे दोनही डोस घेणाऱ्या भारतीय प्रवाशांना मात्र परदेश भ्रमणाचा लाभ मिळू शकणार नाही असे म्हटले आहे.Another international plot against India, covaxin vaccinators will not be allowed to travel abroad under the travel policy


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारताने विकसित केलेल्या कोव्हॅक्सिन लसीवर संशय घेणे आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरूच आहे. त्यामुळे अनेक देशांनी आपल्या ट्रॅव्हल पॉलीसीमध्ये

‘भारत बायोटेक’ निर्मित ‘कोवॅक्सिन’ या लसीचे दोनही डोस घेणाऱ्या भारतीय प्रवाशांना मात्र परदेश भ्रमणाचा लाभ मिळू शकणार नाही असे म्हटले आहे.



कोरोना संक्रमणा दरम्यान जगातील अनेक देशांनी आपली ‘प्रवासी धोरण’ आखणे सुरू केलंय. कोविडविरुद्ध सुरक्षेसाठी लस घेणाºया इतर देशांच्या नागरिकांना आपल्या देशात प्रवेश देण्यासाठी ‘ट्रॅव्हल पॉलिसी’ तयार करण्याचं काम अनेक देशांत सुरू आहे.

परदेशी पाहुण्यांना आपल्या देशात प्रवेश देण्यासाठी देश आपल्या देशात परवानगी देण्यात आलेल्या लस किंवा जागतिक आरोग्य संघटनेकडून प्राधान्य देत आहेत.

या यादीत सीरम इन्स्टिट्यूट ऑ फ इंडियाच्या ‘कोव्हिशिल्ड’सहीत, मॉडर्ना, पी फायझर, अ‍ॅस्ट्रेझेनेका (दोन), जान्सेन (यूएस आणि नेदरलँड) तसंच सिनोफार्म / बीबीआयपी या लसींचा समावेश आहे. मात्र, या यादीत ‘भारत बायोटेक’ निर्मित ‘कोवॅक्सिन’ या लसीचा समावेश नाही.

यादीत लसीचा समावेश व्हावा यासाठी ‘भारत बायोटेक’कडून पाठपुरावा सुरू असला तरी आणखी माहितीची आवश्यकता असल्याचा उल्लेख कागदपत्रांत केलेला आहे.

‘जागतिक आरोग्य संघटने’कडून दिल्या गेलेल्या माहितीप्रमाणे, यासंदर्भात मे – जून महिन्यात एक बैठक आयोजित केली जाऊ शकते. कंपनीकडून आवश्यक ती कागदपत्रं सादर केल्यानंतर या निर्णयावर फेरविचार केला जाण्याची शक्यता आहे.

यासाठीच्या प्रत्येक प्रक्रियेला किमान आठवड्याभराचा वेळ लागण्याची शक्यता आहे.एखाद्या लसीला इतर देशांनी परवानगी दिलेली नसल्यास किंवा या लसीचा जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत समावेश नसल्यास या लसीचा लाभ घेणाºया प्रवासी ‘नॉन – व्हॅक्सिनेटेड’ म्हणजे ‘लस न घेणारे’ म्हणून गणले जातील.

अर्थातच, ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ‘कोवॅक्सिन’ लसीचे लाभार्थी आणखी काही महिने आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या परवानगीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

Another international plot against India, covaxin vaccinators will not be allowed to travel abroad under the travel policy

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात