बॅँक कर्मचाऱ्यांची दिवाळी, नफा झाल्याने कर्मचाऱ्यांना पंधरा दिवस बोनस पगाराची मिळणार भेट


कोरोनाच्या महामारीमुळे देशातील अनेक उद्योगांतील कर्मचाऱ्यांच्या वेतनाला कात्री लागली आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. मात्र, या काळात नफा वाढल्याने बॅँक कर्मचाऱ्याना पंधरा दिवस पगाराची भेट मिळणार आहे. स्टेट बॅँक ऑ फ इंडिया, कॅनरा बॅँक, बॅँक ऑ फ महाराष्ट्राने गेल्या वर्षी चांगला नफा मिळविला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यातील हिस्सा मिळणार आहे.Diwali for bank employees, employees will get a fortnightly bonus salary for making a profit


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोनाच्या महामारीमुळे देशातील अनेक उद्योगांतील कर्मचाऱ्यांच्या वेतनाला कात्री लागली आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. मात्र, या काळात नफा वाढल्याने बॅँक कर्मचाऱ्याना पंधरा दिवस पगाराची भेट मिळणार आहे.

स्टेट बॅँक ऑ फ इंडिया, कॅनरा बॅँक, बॅँक ऑ फ महाराष्ट्राने गेल्या वर्षी चांगला नफा मिळविला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यातील हिस्सा मिळणार आहे.



इंडियन बँक असोसिएशनने नोव्हेंबर २०२० मध्ये केलेल्या वेतन करारात कामगिरीवर आधारित आर्थिक लाभाची तरतूद असल्याने कर्मचाऱ्यांना इन्सेंटिव्ह मिळणार आहे.

त्यामुळे नफ्याच्या प्रमाणाच्या तुलनेत काही दिवसांचे वेतन प्रोत्साहन म्हणून देण्यात येणार आहे. कोणत्याही सार्वजनिक उपक्रमाने पाच ते दहा टक्के नफा मिळविला तर कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा अतिरिक्त पगार मिळतो.

कोरोनाच्या काळातही स्टेट बॅँक ऑ फ इंडियाला तब्बल २०,११०.१७ कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. मागील वर्षीपेक्षा हा नफा ४१ टक्यांनी जास्त आहे.

त्यामुळे बॅँकेतील अडीच लाख कर्मचाऱ्यांना पंधरा दिवसांचा बोनस पगार भेट म्हणून मिळणार आहे.बँक ऑ फ महाराष्ट्रनेही चौथ्या तिमाहीत १६५ कोटींचा नफा मिळविला आहे. त्यामुळे बँकेनेही कर्मचाऱ्यांना काही प्रमाणात लाभ दिला आहे.

Diwali for bank employees, employees will get a fortnightly bonus salary for making a profit

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात