भारतात मे अखेरपर्यंत मिळणार ३० लाख स्फुटनिक- व्ही लसी


कोरोना प्रतिबंधक लसीच्या तुटवड्याने भारतीय हैराण झाले आहेत. मात्र, आता एक दिलासादायक बातमी आली आहे. भारतात मे महिन्याच्या अखेरपर्यंत रशियाच्या स्फुटनिक-व्ही लसीचे एकूण ३० लाख डोस आयात होणार आहेत. जूनपर्यंत ५० लाख डोस आयात केले जातील असा दावा रशियातील भारताचे राजदूत डी.बाला व्यंकटेश वर्मा यांनी केला आहे.India to get 3 million Sputnik-V vaccines by end of May


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक लसीच्या तुटवड्याने भारतीय हैराण झाले आहेत. मात्र, आता एक दिलासादायक बातमी आली आहे. भारतात मे महिन्याच्या अखेरपर्यंत रशियाच्या स्फुटनिक-व्ही लसीचे एकूण ३० लाख डोस आयात होणार आहेत.

जूनपर्यंत ५० लाख डोस आयात केले जातील असे रशियातील भारताचे राजदूत डी.बाला व्यंकटेश वर्मा यांनी सांगितले आहे.स्फुटनिक लसीची निर्मिती आॅगस्ट महिन्यापासून भारतातच होण्याची शक्यता असल्याचे सांगून वर्मा म्हणाले भारतात निर्मितीला सुरुवात झाल्यास



देशात मोठ्या प्रमाणात लसीचे डोस उपलब्ध होतील. कोरोना विरोधी लसींमध्ये केवळ एक डोस घ्यावा लागणाऱ्या स्फुटनिक लसीसाठी देखील भारताने रशियाला प्रस्ताव पाठवला आहे. भारताकडून या लसीसाठी मंजुरी मिळणं अद्याप बाकी आहे.

स्पुतनिक-व्ही लसीची आयात भारतातील हैदराबाद येथील डॉ रेड्डीज लॅबरॉटरी कंपनीकडून केली जात आहे. भारतात ८५ कोटींहून अधिक स्पुतनिक-व्ही लसीची निर्मिती करण्याची योजना आहे.

सध्या देशात दोन टप्प्यात एकूण २ लाख १० हजार लसीचे डोस रशियातून आले आहेत. भारताने १२ एप्रिल रोजी रशियाच्या स्पुतनिक-व्ही लसीच्या वापराला मंजुरी दिली होती. डॉ. रेड्डीज लॅबरॉटरीनं स्पुतनिक-व्ही लसीसाठी रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंडसोबत करार केला होता.

भारतीय बाजारात स्फुटनिक -व्ही लसीच्या एका डोसची किंमत ९९५ रुपये इतकी आहे. कोरोना विषाणू विरोधात स्पुतनिक-व्ही लसीची परिणामकारकता ९० टक्क्यांहून अधिक आहे.

India to get 3 million Sputnik-V vaccines by end of May.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती