विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीत सत्ता मिळवल्यानंतर आम आदमी पक्षाने आता थेट उत्तर प्रदेशात शिरकाव करण्यासाठी चाचपणी सुरु केली आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी दिल्लीत आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांची भेट घेतली. यामुळे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीसाठी युती होण्याच्या चर्चेला उधाण आले.AAP trying to enter in UP politics also
अखिलेश यांनी या भेटीचे छायाचित्र ट्विट केले. अखिलेश यांनी निवडणुकीच्या धावपळीतही वेळ दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले. त्यांनी ट्विटद्वारे हे सुद्धा स्पष्ट केले की, भाजपची अत्याचारी धोरणे आणि नुकत्याच झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकांबाबत चर्चा झाली.
गेली पाच वर्षे आपचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपले सारे लक्ष दिल्लीवरच केंद्रीत केले होते. आता मात्र त्यांनी गुजरात, पंजाबमध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे.
पुढील वर्षी या राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकात आम आदमी पक्ष हिरीरीने उतरणार असून भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न करणार आहे. आता पक्षाने देशात सर्वांत मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात संधी मिळते का याची चाचपणी सुरु केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App