माजी पोलिस अधिकाऱ्याच्या घराच्या तळघरात सापडली ६५० लॉकर, कोट्यवधी रुपये जप्त


विशेष प्रतिनिधी

नोएडा : येथील माजी पोलिस अधिकारी आरएन सिंग यांच्या घराच्या तळघरात ६५० लॉकर आढळली असून कोट्यवधी रुपये जप्त केले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात लॉकर सापडल्याची पहिलीच घटना आहे. 650 lockers found in basement of former police officer’s house, crores of rupees seized

वर गेल्या ३ दिवसांपासून प्राप्तिकर विभागाचे छापे सुरू आहेत. त्यांचा मुलगा खाजगी लॉकर फर्म चालवतो. छाप्यादरम्यान या लॉकर्समधून कोट्यवधी रुपयांची रोकड सापडली.  गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध राज्यातील व्यापारी, नोकरदार, उच्च अधिकाऱ्यांच्या घरावर छापेमारी सुरु आहे. य़ा छापेमारीतून मोठ्या प्रमाणात पैसा जप्त केला जात आहे. सध्या नोएडा येथील यूपी कॅडरचे माजी आयपीएस अधिकारी आरएन सिंग यांच्या घरावर गेल्या ३ दिवसांपासून छापे सुरू आहेत. या छापेमारीत कोट्यवधी रुपये जप्त केले आहेत.



माजी आयपीएस अधिकारी सिंग यांच्या घराच्या तळमजल्यावर छापा मारला. लॉकर रुममधून मोठी रक्कम जप्त केली आहे.  आरएन सिंग यांचा मुलगा त्यांच्या घराच्या तळघरात खाजगी लॉकर फर्म चालवत असून  हे लॉकर्स भाड्याने दिले आहेत. प्राप्तिकर विभागाने येथील शोध मोहिमेत कोट्यवधी रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. दरम्यान हे पैसे कोणाचे आहेत हे स्पष्ट झाले नसले तरी? शोध मोहीम अजूनही सुरू आहे. या रुममध्ये ६५० लॉकर असल्याचे सांगितले जात आहे.

650 lockers found in basement of former police officer’s house, crores of rupees seized

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात