कोरोनाची दुसरी लाट डॉक्टरांसाठीही घातक, तीनशेहून अधिक डॉक्टरांचा मृत्यू


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात दररोज २० ते २५ डॉक्टरांचा मृत्यू होत आहे. दुसऱ्या लाटेत कोरोनाचा नवीन प्रकार वेगाने पसरत असल्याने डॉक्टरांना लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे.300 doctors died due to corona

आतापर्यंत देशभरात तीनशेहून अधिक डॉक्टरांचा मृत्यू झाला असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनने दिली आहे.‘आयएमए’ने दिलेल्या माहितीनुसार देशात दुसऱ्या लाटेचे थैमान सुरू झाल्यानंतर १८ मे पर्यंत सुमारे ३२९ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे.



अर्थात सर्वकष आकडेवारी अद्याप उपलब्ध नसल्याने संख्येत फरक राहू शकतो. पहिल्या लाटेत गेल्यावर्षी सुमारे ७४८ डॉक्टरांना आपला जीव गमवावा लागला आहे. यानुसार आतापर्यंत १ हजाराहून अधिक डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे.

आयएमएकडे एकूण ३.५ लाख डॉक्टरांची नोंदणी आहे आणि प्रत्यक्षात देशात १२ लाखाहून अधिक डॉक्टर आहेत. त्यामुळे एकूण संख्येच्या प्रमाणात नोंदणी कमी असल्याने मृतांची संख्या अधिक राहू शकते, असेही आयएमएने म्हटले आहे.

300 doctors died due to corona

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात