पुण्याच्या सोळा वर्षीय मुलाने टिपले चंद्राचे सुंदर आणि आतापर्यंतचे सुस्पष्ट छायाचित्र


ॲस्ट्रोफोटोग्राफी’ चा छंद असलेल्या पुण्यातील सोळा वर्षीय मुलाने स्वत:च्या नजरेतून चंद्राचे एक सुंदर आणि सुस्पष्ट छायाचित्र टिपले. सोशल मीडियावर त्याने हे छायाचित्र टाकल्यानंतर चंद्राच्या सर्वोत्कृष्ट छायाचित्रांपैकी हे छायाचित्र असल्याचे सांगत, खगोलप्रेमींंकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अल्पावधीतच हे छायाचित्र सर्वत्र व्हायरल झाल्यामुळे सोशल मीडियावर सध्या तो चर्चेचा विषय ठरला आहे. प्रथमेश जाजू असे या मुलाचे नाव आहे.A sixteen year old boy from Pune took a beautiful and clear picture of the moon


विशेष प्रतिनिधी

पुणे : ॲस्ट्रोफोटोग्राफी’ चा छंद असलेल्या पुण्यातील सोळा वर्षीय मुलाने स्वत:च्या नजरेतून चंद्राचे एक सुंदर आणि सुस्पष्ट छायाचित्र टिपले. सोशल मीडियावर त्याने हे छायाचित्र टाकल्यानंतर चंद्राच्या सर्वोत्कृष्ट छायाचित्रांपैकी हे छायाचित्र असल्याचे सांगत,

खगोलप्रेमींंकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अल्पावधीतच हे छायाचित्र सर्वत्र व्हायरल झाल्यामुळे सोशल मीडियावर सध्या तो चर्चेचा विषय ठरला आहे. प्रथमेश जाजू असे या मुलाचे नाव आहे.



प्रभात रस्त्यावर वास्तव्यास असलेल्या प्रथमेशला खगोलशास्त्रामध्ये विशेष रस आहे. खगोलशास्त्रातील सर्वात जुनी संस्था असलेल्या ज्योतिर्विद्या परिसंस्थेचा तो सदस्य आणि स्वयंसेवक आहे.

छायाचित्राविषयी प्रथमेश म्हणाला, काही अभ्यासपूर्ण लेख आणि यू ट्यूबवरील काही व्हिडिओ पाहून प्रोसेसिंग आणि इमेज कशा घ्यायच्या याची माहिती घेतली होती. मी चंद्राचे एकच छायाचित्र काढू शकलो असतो. पण त्याच्या ५० हजार इमेज काढल्या.

आपण कुठलेही छायाचित्र पाहताना ते झूम करतो तेव्हा ते ब्लर किंवा पिक्सिलाईट होते. ते टाळण्यासाठी चंद्राच्या विविध भागांची छायाचित्रे टिपली. जसा आपण मोबाइलमध्ये ‘पॅनोरमा’ काढतो, तसाच मी चंद्राचा पॅनोरमा काढला. चंद्राच्या छोट्या भागाला झूम करून त्याचे छायाचित्र काढले.

त्यानंतर छोट्या छोट्या भागांचे व्हिडिओ काढले, त्यातून छायाचित्र मिळाली. एका व्हिडिओमधून तब्बल २००० हजार छायाचित्रे मिळाली. या माध्यमातून जवळपास ३८ व्हिडिओ काढले. मग एक व्हिडिओ घेऊन तो प्रोसेस केला आणि त्यातून एक छायाचित्र तयार केले.

३८ छायाचित्र काढल्यानंतर मग ती एकमेकांमध्ये मिक्स करत गेलो. सर्व इमेज जोडल्यानंतर एक छायाचित्र तयार केले. भारतात अजून तरी अशा पद्धतीने कुणी छायाचित्र काढले नसल्याचा दावाही त्याने केला.

लॉस एंजलिस येथील एका विद्यापीठातील तरुण मुनर सरफेसवर पीएचडी करीत आहे. त्याने हे छायाचित्र मला मिळेल का, अशी मागणी केली. त्याला छायाचित्र पाठविल्यानंतर प्रबंधासाठी त्याचा खूप उपयोग झाला असल्याचे प्रथमेशने अभिमानाने सांगितले.

खगोलशास्त्राची विशेष आवड असल्याने ॲस्ट्रॉॅनॉॅमी आणि ॲस्ट्रॉफिजिक्समध्ये करिअर करण्याची इच्छा आहे. चंद्राचेच छायाचित्र परत काढायचे आहे. पण यासाठी वेळ आणि मुबलक डाटा असायला हवा. पुढील काळात आकाशगंगेतील विविध ग्रह, ताऱ्यांची छायाचित्र काढण्याचे नियोजन आहे. त्यासाठी हिमालयात जाणार असल्याचे प्रथमेशने सांगितले.

A sixteen year old boy from Pune took a beautiful and clear picture of the moon

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात