कोरोनाची दुसरी लाट ओसरणार कधी? ; तिसऱ्या लाटेचेही शास्त्रज्ञांकडून भाकीत


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट कधी संपणार ? आणि तिसरी कधी येणार याचे भाकीत शास्त्रज्ञानी केले आहे. त्यामुळे त्या दृष्टीने जनतेने वागण्याची गरज निर्माण झाली आहे. शास्त्रज्ञांच्या मते दुसरी लाट जुलै अखेर ओसरणार असून पाच ते सहा महिन्यांनी तिसऱ्या लाटेचा धोका आहे. When will the second wave of Corona Go? ; The Third wave Is also predicted by scientists

सध्या देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. भारत सरकारच्या विज्ञान मंत्रालयांतर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने स्थापन केलेल्या शास्त्रज्ञांच्या तीन सदस्यांच्या पॅनलने लाट कधी संपणार आणि तिसरी लाट कधी येईल, याचा अंदाज व्यक्त केला आहे.



भारतात कोरोनाची दुसरी लाट जुलैपर्यंत ओसरण्याची शक्यता आहे. तर, जवळपास सहा ते आठ महिन्यांनी कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. SUTRA मॉडेलचा वापर करुन शास्त्रज्ञांनी हे भाकीत केले आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत दररोज 1.5 लाख रुग्ण आढळतील. तर, जूनपर्यंत ही संख्या घटून 20,000 जाईल.

महाराष्ट्रात कोरोनाचा उच्चांक

पॅनलमधील एक सदस्य आणि आयआयटी कानपूरचे प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल यांनी सांगितलं, की महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, झारखंड, राजस्थान, केरळ, सिक्कीम, उत्तराखंड, गुजरात, हरियाणा, दिल्ली आणि गोवासारख्या राज्यांनी अधिक रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला आहे. मॉडेलनुसार, सहा ते आठ महिन्यांमध्ये कोरोनाची तिसरी लाट येईल. प्रोफेसर अग्रवाल म्हणाले, लसीकरण झाल्याने अधिक लोक प्रभावित होणार नाहीत. ऑक्टोबर 2021 पर्यंत तिसरी लाट येणार नाही.

When will the second wave of Corona Go? ; The Third wave Is also predicted by scientists

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात